यवतमाळ सामाजिक

नगर परिषदेचे आरोग्य विभाग झोपेत

नगर परिषदेचे आरोग्य विभाग झोपेत

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वडगाव येथील चार बालकांना डेंगूंची लागण

यवतमाळ/ वडगाव येथील एका प्लॉटमध्ये गाईचा गोठा आहे या गायीच्या गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेण असून या शेणाची दुर्गंधी सर्व दूर पसरली आहे तसेच या शेणावर मच्छर तसेच इतर किड्यांमुळे परिसरातील नागरिकांना डेंगूची लागण होत असून या परिसरात चार बालकांना डेंगू झाला आहे तसेच याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेच्या आरोग्य विभागात केली असून आरोग्य विभागाने अजून कुठलीही दखल न घेतल्याने नगर परिषदेच्या आरोग्य विभागाविषयी वडगाव परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

यवतमाळ मधील वडगाव मध्ये मोठ्या प्रमाणात समस्येचा डोंगर असून या परिसरात नगर नगर परिषदेचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे अशातच या परिसरात मोक्षधाम मागेच एक गाईचा गोठा आहे या गाईच्या गोठ्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून येथे मोठ्या प्रमाणात रहिवासी राहतात नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी रहिवासी राहतात त्या ठिकाणी जनावरांचा गोठा नसावा असा नियम आहे या नियमाला डावलून या परिसरातील एका नागरिकांनी गायीचा भल्ला मोठा गोठा बांधला असून या गोठ्यात मोठ्या प्रमाणात शेणखत ठेवण्यात आले आहे या शेणखतावर मच्छरांचे साम्राज्य असून या मच्छरांमुळे परिसरातील बालकांना डेंगू सारखा आजार जडला आहे अशातच या शेणखताची दुर्गंधी सर्वजण पसरत असून येथील नागरिकांना या संपूर्ण प्रकाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशातच या संपूर्ण प्रकाराची तक्रार यवतमाळ नगर परिषदेच्या आरोग्य विभागात करण्यात आली मात्र सदैव झोपेत असलेले आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजूनही या तक्रारीची साधी दखल घेतली नसून पाहणी सुद्धा केली नसल्याने येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे

Copyright ©