यवतमाळ सामाजिक

श्रीचक्रधर स्वामी जयंतीबाबत शासकीयआदेशा ची अंमलबजावणी करा 

श्रीचक्रधर स्वामी जयंतीबाबत शासकीयआदेशा ची अंमलबजावणी करा 

पांढरकवडा : सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करावी, असा शासनाने आदेश निर्गमित केला आहे. या शासकीय परिपत्रकानुसार सर्व शासकीय, निमशासकीय

कार्यालयात अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी महानुभाव पंथीयांनी तहसील- दारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा महाराष्ट्र शासनाने सन २०२४ मध्येसामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नव्याने समावेश केला. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने २७ डिसेंबर २०२३ आणि १८ जानेवारीला स्वतंत्र परिपत्रक निर्गमित केले. राज्यात तीनटक्के,देशात दीड कोटीआणिजगभरात कोट्यवधी संख्येने असणाऱ्या

महानुभाव पंथीय साधकांसह मराठी सारस्वतानेहि या शासन निर्णयाचे स्वागत केले. विभागीयआयुक्त,कार्यकारी जिल्हाधिकारी, मुख्यअधिकारी, महानगरपा लिकाआयुक्त अधिनस्त सर्व शासकीय- निमशासकीय कार्यालयांमध्ये गुरुवारी ५ सप्टेंबरला भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती कार्यक्रमसाजराकरण्या संदर्भतअंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. शासन स्तरावर ही जयंती साजरी करावी, अशी मागणी महानुभाव पंथीय समूहाचे महंतप पू. प. म. लाडबाबा हर्सूल, प पू. अनंतराजदादा लाड, प. पू. साधेराजदादा लाड,

व्यंकटअवथळे, गोविंद अवथळे, दीपक बोपटे, नितीन बोपटे, अरुण डोळे, किशोर घाटोळ, श्रीकांत काळे, माया चेके वअनुयायांनी केली.

Copyright ©