यवतमाळ सामाजिक

दहेगाव येथील गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

दहेगाव येथील गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

तहसीलदार राळेगाव यांना दिले निवेदन

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील खंड 1 व 2 मधील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामात गहू हरभरा तूर ज्वारी व अन्य पिके होती तर अवकाळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु दहेगाव येथील तलाठी यांनी फक्त 96 शेतकऱ्यांची यादी तयार केली व बाकी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवले आहे तर सर्व वंचित शेतकऱ्यांची यादी तयार करुन गारपीट अनुदानचा लाभ देण्यात यावा संबंधित तलाठी यांची बदली करण्यात यावी तसेच कापूस सोयाबीन अनुदान मधुन ई पिक असताना सुद्धा अनेक शेतक-यांचे नावे यादी मध्ये नाही आहे सुटलेल्या नावांचा कापूस सोयाबीन अनुदान यादी मध्ये समाविष्ट करुन लाभ देण्यात यावा अशी मागणी दहेगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदनात केली यावेळी किशोर दातारकर,नारायण हरबडे, नरेंद्र धोबे, मारोती डाहुले, दशरथ खैरे, खुशाल काळे, सुनील परचाके, पद्माकर जुमनाके, प्रमोद उताणे, गजानन धनरे, मंगल कुडमथे तसेच सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते

Copyright ©