यवतमाळ सामाजिक

त्या ‘भामट्या सेतू चालकाला महिलांकडून चोप

त्या ‘भामट्या सेतू चालकाला महिलांकडून चोप

एका ग्राहकाशी वाद घालनाऱ्या त्या वादग्रस्त भामट्या सेतू चालकाला एका तरुणासह त्याचा महिला नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला.हा प्रकार 23 ऑगस्ट च्या सायंकाळी त्या वादग्रस्त सेतूमध्ये घडला.

कळंब शहरात एका भामट्याने सेतू थाटला. झटपट पैसे कमविन्याच्या नादात त्याने बनावट कागदपत्रे वाटण्याचा गोरखधंदा ही सुरु केला. कोठा येथील शेतकरी अनिकेत जळीत या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर दुसऱ्या एका शेतकऱ्याशी संगणमत करून त्याचे पासबुक व आधार कार्ड लावून बनावट पिकविमा काढला. घरकुलासाठी लागणारे उत्पन्न दाखले, अधिवास, जातं प्रमाणपत्र ही एडिट करून बनावट रित्या वाटले. प्रत्येकी ग्राहकाकडून 3 ते 4 हजार रुपये उकळले. लाडकी बहीण योजनेच्या महिलांकडून 150 रुपये उकळले. त्यातच आज सायंकाळी एक महिला व तिचा मुलगा बांधकामं कामगार पेटी चे कागदेपत्र तयार झाले का हे विचारण्यासाठी त्या सेतू केंद्रात गेले असता. त्या भामट्याने त्या ग्राहकाशी वाद घातला. दरम्यान त्या ग्राहकाणे त्या सेतू केंद्र चालकाला दिलेले 700 रुपये परत मागितले. मात्र त्या भामट्याने शिवीगाळ केल्याने संतापलेल्या त्या ग्राहक व त्याच्या महिला नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला. मात्र पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हा वाद निवळला.

पोलिसांत अनेक तक्रारी

त्या भामट्या सेतू चालकाविरोधात शेतकऱ्यासह महिलांची फसवंनुक केल्याच्या तक्रारी आहे. मात्र पोलिस व महसूल प्रशासन मूग गिळून गप्प का? हा मोठा प्रश्न आहे.

उद्या मुख्यमंत्र्याकडे तक्रार

उद्या यवतमाळ येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियोजित सभा आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांकडून पैसे उकळल्यांची तक्रार आपण मुख्यमंत्र्याकडे करणार आहो.असे शिवसेना तालुकाप्रमुख अभि पांडे यांनी पत्रकारशक्ती शी बोलताना सांगितले. त्यामुळे पोलीस, महसूल प्रशासन, कृषी विभाग, आय, सि, डी, एस. यां विभागाणे कारवाईसाठी केलेली दिरंगाई या विभागाना भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Copyright ©