यवतमाळ सामाजिक

एसटी कामगाराचे विविध मागण्यासाठी आंदोलन

एसटी कामगाराचे विविध मागण्यासाठी आंदोलन

एस. टी. कामगारांच्या प्रलंबीत आर्थिक मागण्या व एस. टी. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचा-यांएवढे होण्यासाठी राज्यातील बहुतांश संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात येऊन आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ३ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. व राज्यभर घंटानाद, महाआरती, द्वारसभा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राखी पाठवणे इत्यादी प्रकारे आपण सर्वांनी राज्यभर जोरदार राळ उठवली आहेच…. याची दखल घेऊन दि ७ अॅागष्ट रोजी राज्यसरकारच्या वतीने मा. मुख्यमंत्री मा.

उपमुख्यमंत्री वित्त, मा. उपमुख्यमंत्री गृह यांनी बैठक घेऊन वित्त विभागाने आठ दिवसात अंतीम प्रस्ताव सादर करावा व २० अॅागष्टला मुख्यमंत्री स्वतः बैठक घेऊन यावर निर्णय घेतील असे पत्र शासनाकडून कृती समितीला देण्यात आले. त्याप्रमाणे व्यय व वित्त विभागाच्या दोन कृती समितीच्या दोन बैठका देखील झाल्या असुन दि २० अॅागष्टची शासकीय बैठक मा. मुख्यमंत्र्याच्या व्यस्त शेड्युल्डमुळे दोन-तीन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. असे जरी असले तरी शासनाच्या व महामंडळाच्या स्तरावर आपल्या प्रस्तावावर चर्चा चालू असुन यावर सरकारने निर्णयात्मक तोडगा काढून राज्यसरकार एवढे वेतन करणे आवश्यक आहे या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त कृती समितीच्यावतीने आज दि २३ अॅागष्ट २०२४ रोजी बस स्थानक यवतमाळ येथे गेट समोर निदर्शने करण्यात आली.

Copyright ©