यवतमाळ सामाजिक

ऊत्कुष्ट छायाचित्रकार पुरस्काराने मनोज कटकतलवारे सन्मानित

ऊत्कुष्ट छायाचित्रकार पुरस्काराने मनोज कटकतलवारे सन्मानित

घाटंजी फोटोग्राफर बहुउद्देशीय संस्थेचे वतीने ,जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून “विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धे व प्रदर्शन 2024” आयोजित करण्यात आले होते.

“सामाजिक जीवनातील ऊत्कुष्ट छायाचित्रकार” पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

दिनांक 18 आगस्ट रोजी शाल व सन्मानपत्र देऊन यवतमाळ जिल्ह्य़ातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार मनोजकुमार कटकतलवारे यांना मान्यवरांकडून गौरविण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार राजू तोडसाम, क्रांती ताई धोटे याची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेचे सचिव -सचिन कर्णेवार, यानी कटकतलवारे याच्या छायाचित्रण क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला.राष्ट्रीय सन्मान व वृत्तपत्र छायाचित्रण तसेच अनेक राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेतील पुरस्काराच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहीती उपस्थितीना दिली.मान्यवरांकडून छायाचित्रण प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्राला उत्तम दाद देण्यात आली.

यावेळी विदर्भस्तरीय छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष- किशोर ठाकरे,उपाध्यक्ष -अजिंक्य रुईकर, सचिन कर्णेवार, प्रशांत भोरे,सुनील कोटरंगे,

राजन वाडेकर,कपिल नगराळे,सह सर्व घाटंजी छायाचित्रकार बंधूनी परिश्रम घेतले.

Copyright ©