कॉटन सिटी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर सामाजिक संस्था द्वारा जागतिक छायाचित्र दिन साजरा
जागतिक छायाचित्रण दिन दरवर्षी 19 ऑगस्टला साजरा केला जातो. 1839 साली फ्रेंच शास्त्रज्ञ लुई दागेर यांनी ‘दागेरोटाइप’ ही पहिली छायाचित्रण पद्धत विकसित केली, त्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला आहे. छायाचित्रण कला आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ही एक क्रांतिकारक घटना ठरली.
त्याच अनुषंगाने जगभरातील सर्व फोटोग्राफर बांधव आज जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरे करतात त्याच. अनुषंगाने आज यवतमाळ येथील सर्व छायाचित्रकार मित्र परिवाराने सकाळी शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या परिवारांना अल्पोपहार वाटप करून मेडिकल चौक येथून माननीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांगुळकर तसेच युवा नेते नितीन भाऊ मिर्झापुरे यांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली व त्यानंतर शहरातील थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विविध मुख्य रस्त्यावरून मार्ग काढत समारोप हा जाजू चौक येथे करण्यात आला . या कार्यक्रमास शहरातील वरिष्ठ छायाचित्रकार व युवा पिढीने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच बाभूळगाव,राळेगाव ,आर्णी, नेर, दिग्रस, कळंब इत्यादी तालुक्यातील फोटोग्राफर बंधूंनी सहभाग नोंदवला
Add Comment