क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान करून लेट अल्ताफ अली काझी इंग्लिश स्कुल च्या विध्यार्थ्यानी केला आगळा वेगळा स्वातंत्र्य दिन साजरा
रुई (वाई ) येथील लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये 15 ऑगस्ट निमित्त पालक गजानन भाऊ मानकर आणि मुख्याध्यापक जावेदअली काझी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या फोटो चे पूजन करून पुष्प हार अर्पण केल्यानतर गजानन भाऊ मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. नेहमी प्रमाणे गावातून विध्यार्थ्यांची
प्रभात फेरी (रॅली )निघाल्यावर चौकात चौकात विध्यार्थ्यानी क्रांतिकारी वेशभूषा परिधान करून पथनाट्य सादर करून क्रांतिकारकाचे विचार संपूर्ण गावासमोर आपल्या अभिनयातून व्यक्त केले. यामध्ये सर्वप्रथम अरहम अली काझी यांनी एक शेर म्हणत लिख रहा हू मै अंजाम जिसका कल आगाज आयेगा मेरे लहू का एक एक कत्रा इन्कलाब लायेगा. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत गावकर्यांना मंत्रमुग्ध केले त्या नंतर झाशीची राणी अष्टांगीका भवरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयेश मेश्राम,बिरसा मुंडा चैतन्य तुमराम,भारतमाता मृणाली ढेकाळे,महात्मा गांधी अथर्व इंगळे,भगतसिंग सम्यक शेंदरे,सुखदेव वंश गारोडी, राजरुगुरू साई केळकर,चंद्रशेखर आझाद शनाय सतीश तायडे, सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत समर्थ प्रशांत केळकर हे होते अशा प्रकारे सर्व विध्यार्थ्यानी क्रांतिकारकाची विचार आपल्या अभनयातून संपूर्ण गावाला व्यक्त करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. त्या नंतर शाळेत दरवर्षी प्रमाणे विध्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव देण्यासाठी भाषण, गितगायन चा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाफिज अकबर खान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संपादक सय्यद वकील मामा होते,पालक निशांत ठाकरे, सचिन गावंडे, प्रफुल काळे, गजानन गोंधळेकर, सलीम कुरेशी हे होते. विध्यार्थांनी एका पेक्षा एक असे भाषण अलिशबा अकबर खान, भावेश ठाकरे, स्वरा लोणकर, रिजा मोहम्मद सादिक अशहर सय्यद, हारीसअली काझी, सृष्टी तरारे, श्रेया गंथले, गौरी पोले, भागश्री चापले इत्यादी विध्यार्थ्यानी गीत गायले आणि आलेल्या पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले त्या नंतर सर्व पाहुणे मंडळीच्या हस्ते विध्यार्थ्यांना बिस्कीट पाकीट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्य्क शिक्षिका नम्रता केवट यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक/सचिव जावेदअली काझी सर, दिनेश गायकवाड सर, रीना केवट मॅडम, सानिया सय्यद मॅडम, आरती आत्राम मॅडम, तब्बसूम चाऊस मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी संध्या मोहले, शेख राजिक,सय्यद अनिस,पंकज सावळकर शेक अझहर, आबेदअली काझी, उमेरअली काझी, फहादअली काझी नैतिक नमुलवार इत्यादीनी मेहनत घेतली.
Add Comment