यवतमाळ सामाजिक

बेचखेडा येथील अदृष्य वेगवेगळ्या आवाजाचा म. अनिस तर्फे पर्दाफाश

बेचखेडा येथील अदृष्य वेगवेगळ्या आवाजाचा म. अनिस तर्फे पर्दाफाश

(कार्याध्यक्ष – प्रकाश आंबिलकर)

यवतमाळ जिल्ह्यातील, यवतमाळ पासून 25 कि.मी. अंतरावर बेचखेडा (भाम) या छोट्याशा गावात गावातील स्मशानभूमी जवळ व त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतांच्या मधून व जंगली भागात रात्री बेरात्रीला वेगवेगळ्या स्वरूपाचे गावातील लोकांना आवाज ऐकायला येतो. ज्यामध्ये स्त्रीयांच्या रडण्याचा, घुंगरांचा व काही भितीदायक आवाज येत असल्या कारणाने त्या गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. जेणे करून काही आपल्या गावावर अदृश्य शक्तीचे संकट तर येणार नाही ना? अशा स्वरुपाच्या वेगवेगळ्या शंका- कुशंका निर्माण होत होत्या. त्यामुळे त्या गावातच नव्हे तर गावा शेजारील गावांमध्ये सुध्दा फार मोठ्या त्या आवाचं कुतुहल निर्माण झाले असल्या कारणाने शेजारी गावातील बरेचशी मंडळी तो आवाज ऐकण्यासाठी येण्याचा एकप्रकारचा नित्यक्रमच झाला होता. परंतु आवाज जरी ऐकायला येत असला तरी पण तिथे काहीच असे दिसत नव्हते. त्या कारणामुळे प्रत्येक गावामध्ये चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे काही लोकांच्या म्हणन्यानुसार अंधश्रध्दा निर्मुलन समितीकडे या संदर्भाची वाच्यता करून त्यांना एक प्रकारचे आव्हानच दिले होते. त्यामुळे आज दि. 17 ऑगस्ट 2024 म. अनिसचे पदाधिकारी सोबतच हिवरी सर्कलचे पत्रकार ओंकार चेके त्या ठिकाणी भेट दिली असता, गावातील सरपंच व इतर लोकांच्या उपस्थितीमध्ये या आवाजा संदर्भात सोदार्हणासह प्रयोगानिशी चर्चा करण्यात आली.

एखाद्या कुठल्यातरी कुच्शीत व्यक्तीच्या माध्यमातून हा प्रकार एखाद्या विज्ञानाच्या उपकरणाच्या सहाय्याने त्या उपकरणाला सेंसारच्या माध्यमातून मोबाईलला अटॅच करून रात्री बेरात्री तो आवाज करण्याचा प्रकार आढळला किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्या श्रमाच्या पिकाची जंगली जनावराच्या माध्यमातून नुकसान होवू नये किंवा आपल्या पिकाची नासाडी होऊ नये किंवा ते पिक खाऊन टाकू नये या कारणाने त्या जंगली जनावरांना हाकलण्यासाठी म्हणून बरेचशे उपकरणं बाजारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज किंवा माणसांचा मोठ-मोठ्याने भांडणाचा आवाज काढून ते उपकरणे विशिष्ट वेळामध्ये लावले जातात. त्यामुळे त्याच्या आवाजामुळे जंगली प्राणी पळून जातात. ही सुध्दा यामध्ये या अदृष्य आवाजच कारण असु शकते. किंवा एखाद्या पक्षाचा सुध्दा तो आवाज असू शकतो असे त्या ठिकाणी गेले असता संबंधीत लोकांशी चर्चा करून व तेथील पाहणी करुन लक्षात आले आहे.

अशा स्वरुपाच्या अफवांना आपण बळी पडू नये, व इतर ठिकाणी सुध्दा अशा स्वरुपाच्या अफवा पसरवू नये. जर हे विज्ञानाच्या आधारे कुठलीही दैवी शक्ती किंवा अघोरी शक्ती जर सिध्द झाली तर अशा व्यक्तीला म.अनिस तर्फे 21 लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले आहे. व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत असे करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा सुध्दा होवू शकते. असे म.अनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आंबिलकर यांनी गावकऱ्यांच्या लक्षात आणुन दिले.

ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिवरी सर्कलचे पत्रकार ओंकारची चेके यांनी गावातील सरपंच प्रिया लीहितकर,  तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक संतोष व्यावहारे, संजीवनी बेलगमवार शाम पहुरकर गणेश गारोडी, कीर्ती पेटकर, रोशन काकडे, ज्योती वाघमारे,विजय राठोड,सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व गावातील लोकांना अशा स्वरुपाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन लोकांना केले आहे.

Copyright ©