Breaking News यवतमाळ

वकील संघाच्या अध्यक्षाकडून होणारा सततचा मानसिक त्रासाला पिडित होऊन ज्युनिअर वकिलांनी दिला आत्मदहनाचा ईशारा

वकील संघाच्या अध्यक्षाकडून होणारा सततचा मानसिक त्रासाला पिडित होऊन ज्युनिअर वकिलांनी दिला आत्मदहनाचा ईशारा

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय सिसोदिया(जैन) व त्यांचेसोबत इतर सहकारी मिळून ज्युनिअर वकिलांचे शोषण करीत असल्याचे गंभीर आरोप

यवतमाळ:- जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वर्शानुवर्षे शेकडो वकिलांची नव्याने नोंदणी होत असून वरिष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करत आपल्या व्यवसायिक जीवनाची सुरुवात करीत असतात, यवतमाळ येथील वकिल संघाच्या अध्यक्ष यांच्या वागण्याने ज्युनिअर वकिलांना आपले जीवन संपविण्याची वेळ आली आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एका अनोख्या चर्चेला उधाण आलेले आहे ते म्हणजे असे की, न्यायालयीन क्षेत्रामध्ये कामकाज करणारे नवीन वकिलांनी मिळून यवतमाळ येथे सन २०२१ साली नव्याने स्थापन झालेल्या कौटुंबिक न्यायालय यवतमाळ येथे फॅमिली कोर्ट बार असोसिएशन नामक संस्था मा.सहाय्यक धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांच्या सहिनिशी नोंदणी केलेली आहे, व नोंदणीकृत संस्थेची माहिती संबधित न्यायालयातील न्यायाधीश यांना देण्यात आली त्यादरम्यान काही वरिष्ठ वकील मंडळीनी मिळून नोंदणीकृत संस्थेला कडाडून विरोध केला व नोंदणीकृत संस्थेमध्ये सामील असलेली पदाधिकारी यांच्या विरोधात दिनांक.२३/०७/२०२४ रोजी जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष ऍड.संजय सिसोदिया(जैन) यांनी अतिताडीची सभा बोलवून नव्याने नोंदणी झालेल्या संस्था व त्यातील पदाअधिकारी यांचेविरुद्ध ठराव घेऊन कारवाही करणार असल्याचे दम दिला.

झालेल्या सभेनंतर कठोर कारवाई करणार असल्याची बाब संस्थेमध्ये सामील सदस्य यांना माहिती पडताच त्यातील काही सदस्य अत्यंत भयभीत होऊन जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष जैन यांच्या शरणी गेले असल्याची बाब कळते त्याचेच योगसाधून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय सिसोदिया (जैन) यांनी त्यांचे कडून धकधपट करून बळजबरीने पाहिजे ते लिहून घेतले असल्याची बाब ऍड.पवार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये नुमुद केले आहे.

असे असताना फॅमिली कोर्ट बार असोसिएशन मधील सामील सदस्य यांना सदस्यत्व रद्द केल्याबाबतची तोंडी माहिती देण्यात आली व त्यांना न्यायालयीन प्रवेश बंदी करू व कामकाजपासून वंचित ठेवू असे म्हणून दमदाटी करू लागल्याने फॅमिली कोर्ट बार असोसिएशन चे पदाधिकारी प्रचंड भयभीत झाले व त्यांचेपैकी एक उपाध्यक्ष ह्या पदावर कार्यरत असलेले ऍड.जितेश पवार यांना जातीय शिवीगाळ करून चांगला धडा शिकवू तसेच न्यायलामध्ये प्रवेश न करण्याबाबत धमकी देण्यात आली.असे ऍड.पवार यांनी आपला तक्रार अर्ज प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब यवतमाळ व संबधित ईतर विभागाकडे सादर केले असल्याचे त्यांच्या तक्रार अर्जामधून कळते. ह्या संपूर्ण बाबीला तसेच वकील संघाचे अध्यक्ष ऍड.संजय सिसोदिया(जैन) व त्यांच्या इतर सहकारी कडून होणारा सततचा मानसिक त्रासाला पिडित होऊन ऍड.जितेश पवार यांनी कारवाही ची मागणी केली आहे व कोणतीही कारवाही न झाल्यास थेट न्यायालयीन परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

Copyright ©