यवतमाळ शैक्षणिक

जिल्हा परिषद शाळा अर्जुना येथे स्वातंत्र्य दिनी विविध कार्यक्रम

जिल्हा परिषद शाळा अर्जुना येथे स्वातंत्र्य दिनी विविध कार्यक्रम

जिल्हा परिषद शाळा अर्जुना येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वरकडे यांनी ध्वजारोहण केले. तर सर्व सदस्यांनी प्रतिमा पुजन केले

१) मुख्याध्यापक कैलाश गव्हाणकर यांचे आव्हानाला प्रतिसाद म्हणून गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद शाळा अर्जुना ला स्वातंत्र्य दिनाचे निमित्त २० थोर नेत्यांचे फोटो( किंमत ६०००/ रुपये) भेट दिले

२) गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना २०० नोटबुक,४०० पेन,२०० बिस्कीट पुडे,२०० पेन्सिल,खोडरबर,५०० चॉकलेट व इतर खाऊ दिला

२) विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीतांवर अतिशय सुंदर असे लेझीम नृत्य सादर केले

३) विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा यावर सामाजिक कृतीयुक्त गीत सादर केले

४) विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाषणे केली

५) शाळा व्यवस्थापन समितीने सर्व विद्यार्थ्यी,शिक्षक व पालकांना चिवडा व चहा दिला

असा सुंदर कार्यक्रम करण्यासाठी मला माझे सहकारी शिक्षक श्रीमती मासुरकर ,श्रीमती वाढे, कनाके , आडे ,श्रीमती कुडे ,श्रीमती इंगोले ,श्रीमती गंगाळवार आणि शाळा व्यवस्थापन समिती तथा गावातील नागरीकांचे मोलाचे सहकार्य लाभले

या सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कैलाश गव्हाणकर यांनी आभार व्यक्त केले.

Copyright ©