यवतमाळ शैक्षणिक

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न 

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव संपन्न 

सन.2024-25 अंतर्गत तालुका स्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव श्री गुरुदेव विद्या मंदिर जवळा ता . आर्णी येथे दि .13ऑगस्ट 2024 ला संपन्न ़झाला.त्यामध्ये एकुण 14 शाळेनी आपला सहभाग घेतला होता.यामधे जिल्हा परिषद हायस्कूल लोणबेहळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.जागतिक जलसंकट या उप विषयाद्वारे “पाणी हरवलं” ही दर्जेदार नाटिका सादर केली.कु.अपेक्षा भगत,संध्या खुडे , धनश्री जाधव, क्रांती जाधव, संतोषी नैताम, वैष्णवी दबडघाव, आर्यन चव्हाण,रोषन राठोड आदिंनी भाग घेतला होता.मार्गदर्शक शिक्षक श्रीमती शारदा महल्ले,शिक्षक ‌.आ.इकबाल (ग.शि.अ.) ;गावंडे शिक्षिका (उपशिक्षणाधिकारी) शिल्पा मॅडम (उपशिक्षणाधिकारी) यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Copyright ©