यवतमाळ सामाजिक

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखा !

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखा !

हिंदू जनजागृती समितीचे नागरिकांना आवाहन !

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गेल्या 21 वर्षापासून ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवत आहे, यावर्षी सुद्धा जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले . जिल्ह्यात 8 प्रशासकीय कार्यालय, 8 पोलीस कार्यालय आणि 60 हून अधिक शाळांमध्ये निवेदन देऊन मुलांचे प्रबोधन करण्यात आले आहे. तसेच भिंतीपत्रक, हस्तपत्रक, सामाजिक माध्यम याद्वारे सुद्धा व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. ही मोहीम जिल्ह्यात यवतमाळ शहरासह वणी ,दिग्रस,पुसद, नेर, बाभुळगाव, घाटंजी, आर्णी येथे राबवण्यात आली असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे,

राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे राष्ट्र कर्तव्य आहे, हिंदू जनजागृती समिती आपल्या क्षमतेप्रमाणे राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज खाली पडणार नाही याची, फाटणार नाही याची, चुरगळणार नाही, तसेच कुठल्याही प्रकारे राष्ट्रध्वजाची विटंबना होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. तसेच समितीच्या वतीने 15 ऑगस्ट या दिवशी खाली पडलेले खराब झालेले राष्ट्रध्वज ‘सन्मान पेटी’मधे गोळा करण्यात येणार आहे, ज्यांना असे खराब झालेले राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये गोळा करायचे असतील, त्यांनी 9767022 548 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वय मंगेश खान्देल यांनी केले आहे.

Copyright ©