यवतमाळ सामाजिक

वन स्टॉप सेंटर मार्फत होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे जनजागृती

वन स्टॉप सेंटर मार्फत होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे जनजागृती

यवतमाळ – होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे.केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ति या योजने अंतर्गत “महिला सक्षमीकरण केंद्र (hub for women empowerment) या योजने अंतर्गत 100 दिवसीय जनजागृती अभियाना निमित्य लैंगिक समानता “सखी वन स्टॉप सेंटर, यवतमाळ” मार्फत होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे पियुष विलास जगताप जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिबिर उजळणी प्रशिक्षण दरम्यान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बनसोड केंद्रनायक.गुरणुले साहेब सामुग्री प्रबंधक. गजभिये साहेब प्रशासकीय अधिकारी. निरंजन मलकापूर तालुका समादेशक अधिकारी यवतमाळ.

मिनल जगताप केंद्र प्रशासक. प्रमुख मार्गदर्शक होत्या यावेळी सखी वन स्टॉप सेंटर ह्या बाबत माहिती देऊन तेथे आरोग्य सहाय्य, मानसिक समुपदेशन, कायदेविषयक समुपदेशन आदी सुविधां सोबतच पिडीत महिलेला तात्पुरत्या वास्तव्याची सुविधाही पुरविण्यात येते या बाबत माहिती दिली तसेच महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर सेंटर कश्या प्रकारे मदत करते या बाबत सविस्तर माहिती दिली तसेच लैंगिक गुन्ह्या पासून बालकांचे संरक्षण कायदा 2005, घरगुती हिंसाचार कायदा, POSH Act या बाबत माहिती दिली व Women Help line, Child Help line, व Emergency Help Line बाबत मोलाची माहिती दिली.तसेच होमगार्ड प्रशासन केंद्रामध्ये गेल्या सात दिवसापासून महिला उजळणी प्रशिक्षण यशस्वीतेसाठी संगीता मोहोड. सविता मेश्राम.आदी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात महिला होमगार्ड उपस्थित होत्या

Copyright ©