यवतमाळ सामाजिक

मीनाक्षीताई सावळकर यांच्या नेतृत्वात हजारो महिला उपविभागीय कार्यालयावर धडकल्या

मीनाक्षीताई सावळकर यांच्या नेतृत्वात हजारो महिला उपविभागीय कार्यालयावर धडकल्या

 

उमरखेड महागाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू मिळालेल्या नाही. महिला बचत गट मोठ्या प्रमाणात या दोन्ही तालुक्यांमध्ये आहे. पण त्यांना तीस हजार रुपये मिळालेले नाही. महिला सक्षमीकरण महिला बचत गटांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या पण उमरखेड आणि महागाव या मतदारसंघांमध्ये कोणत्याही महिलांना स्वतंत्र उद्योग उभारण्यासाठी अद्याप शासनाने काही दिलेले नाही. तसेच अंतोदय कार्ड सर्वसामान्य लोकांना मिळणार अन्नधान्य आज काही स्वार्थी लोकांनी त्यांचे नाव गाळून मोठ्या मोठ्या लोकांचे नाव टाकलेले आहे. याही लोकांना सामान्य लोकांना जे खरोखरच दारिद्र्य रेषेखाली आहे. त्या लोकांचे नाव अंतोदय कार्ड मध्ये टाकण्यासाठी प्रत्येक कंट्रोलधारकांना थम मशीन दिलेली आहे. पण ही चालत नसल्यामुळे ते शासनाला परत देण्यात यावी ,या साठी नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती . अतिवृष्टी मध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या नुकसानी अंतर्गत आम्ही शासनाला निवेदन देऊन प्रत्येकाच्या बांधावर जाऊन चौकशी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी कमिटी तयार केली होती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कुठलाही मोबदला मिळाला नाही .म्हणून त्यासाठी सुद्धा तसेच शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळालेला नाही .त्यासाठी सुद्धा आज आपण पाहत आहोत मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेला आहे गेली एक महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे विदर्भ ओला दुष्काळ घोषित करण्यात यावा यासाठी ,सुद्धा आज शेतकऱ्याची अवस्था दैनिया आहे ‌पण हे शासन मोठमोठ्या उद्योगांना लोन माफ करतात पण शेतकऱ्यांच्या बाबतीत हे शासन उदासीन आहे. या शासनाला जाग येण्यासाठी या शासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्यासाठी सुद्धा या मोर्चा आयोजित केलेला आहे. 65 वर्षाचे वय वृद्ध व्यक्ती यांना साडेतीन हजार रुपये मिळतात पण यामध्येही सुद्धा शासनाने उत्पन्नाच्या दाखल्याची अट लावली ती अट रद्द करण्यासाठी सुद्धा या मोर्चा त्याचा समावेश केलेला आहे. पी एम किसान योजना या पी एम किसान योजनेमध्ये तूटपुंजी किंमत मिळत असून ते वाढवण्यासाठी शासनाला या आणि निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .या सर्व मागणीसाठी तमाम भगिनी कृषी उत्पन्न बाजार समिती उंमरखेड या ठिकाणी एकत्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मोर्चाला संबोधन करताना मीनाक्षीताई यांनी जर आज आपण घराच्या बाहेर निघत नसाल तर तुम्हाला कुठलाही मोबदला शासन देणार नाही. जोपर्यंत तुम्ही शासनाला भांडणार नाही तोपर्यंत आपल्या पदरात काही पडणार नाही. म्हणून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना होऊ घातलेल्या महामोर्चा मध्ये सामील होण्यासाठी डॉ प्राचार्य मीनाक्षी सावळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य पीसीसी मेंबर महागाव तसेच विभागीय अध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग यांच्या विनंती वरून हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मार्गस्थ होऊन माहेश्वरी चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळेस साहेबराव कांबळे, तातू देशमुख, माजी आमदार खडसे यांनी आपल्या प्रतिक्रिया देऊन सरकार विरुद्ध रोष व्यक्त केला. यावेळेस हजारो महिला उपस्थित होत्या.

Copyright ©