यवतमाळ सामाजिक

चक्रधर स्वामीची जयंती सर्व शासकीय विभागात साजरी करा तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन

चक्रधर स्वामीची जयंती सर्व शासकीय विभागात साजरी करा तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन

घाटंजी महाराष्ट्र शासनाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय विभाग सर्व शाळा महाविद्यालय 5 सप्टेंबर 2024 ला साजरी करावी अशी मागणी घाटंजीचे तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली

जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी व सर्व शासकीय विभागांना दिले आहे

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी करण्याचे निवेदन घाटंजी तालुका जिल्हा यवतमाळ च्या वतीने घाटंजी चे तहसीलदार व मुख्याधिकारी यांना देण्यात आले निवेदन देताना घाटंजी येथील श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक अनंतराज बाबा, श्री ई राजधर दादा सातारकर महाराष्ट्र गवळी समाज संघटना 549 घाटंजी तालुका गवळी समाज संघटनेचे( अध्यक्ष) श्रीकांत भाऊ घोडे,( सचिव ) अरुण अरबट (कोषाध्यक्ष) भाऊरावजी घाटोळ , तुकारामजी चेके . गोविंदराव कालोकार .किसनराव काळे, यादव घोडे,.नितीन बोपटे , दत्तराज घोडे , प्रभू येवले बापूरावजी अरबट .गजू चेके . राजू कालोकार अनिल घाटोळ गौरव काळे शुभम घोडे अनिकेत चौधरी आदी उपस्थित होते

Copyright ©