यवतमाळ सामाजिक

गुंज येथे शुल्लक वादातून दोन गटांत हाणामारी, ८ जणांवर गुन्हे दाखल

गुंज येथे शुल्लक वादातून दोन गटांत हाणामारी, ८ जणांवर गुन्हे दाखल

ता . प्र .निलेश नरवाडे

महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुंज येथे क्षुल्लक कारणांवरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना बुधवारी ८ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले .या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फकीरचंद रामदास आसोले (वय २४) वर्ष रा. गुंज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यातील आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीसोबत रस्त्यामध्ये विटीचे मटेरियल टाकल्याच्या कारणावरुन वाद करुन शिवीगाळ केली व विटीने तसेच धारदार शस्त्राने पाठीवर मारुन जखमी करुन जिवाने मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फकीरचंद रामदास आसोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गजानन प्रल्हाद जोरोळे (वय ३०) वर्ष अधिक ०३ सर्व रा. गुंज महागाव यांच्या विरोधात कलम ११८, ३५२, ३५१(२),३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुसऱ्या गटातील फिर्यादी गजानन प्रल्हाद जोराळे (वय २८) रा. गुंज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यातील आरोपीतांनी संगणमत करुन शेतीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीसोबत वाद करुन फिर्यादीस जिवाने मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी सुरीने फिर्यादीचे नाकावर डाव्या बाजुला, पोटावर मारुन गंभीर जखमी केले व फिर्यादीच्या वडीलांना शिविगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादी गजानन प्रल्हाद जोराळे यांच्या तक्रारीवरून आरोपी फकिरा रामदास आसोले (वय२५) रा. गुंज व अधिक तीन जणांविरुद्ध कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे.

Copyright ©