यवतमाळ सामाजिक

दिवाळखोरी कडे वाटचाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवर कर्मचाऱ्यांचा डोळा

महागाव ता . प्र . निलेश नरवाडे

दिवाळखोरी कडे वाटचाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवर कर्मचाऱ्यांचा डोळा

बाजार समितीच्या मासिक सभेत गाजला विषय

महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळखोरीच्या वाटेवर असताना बाजार समितीकडे असलेली मालमत्ता विकल्या जाण्याची शक्यता दिसून येत असून नुकत्याच झालेल्या महागाव बाजार समितीच्या मासिक सभेत संचालका समक्ष कर्मचाऱ्यांना प्लॉट देण्यासंदर्भात हा विषय चर्चेला आला.सभेमध्ये अनेक संचालकांनी या विषयाला विरोध केला. महागाव न्यायालयाच्या बाजूला मुख्य ठिकाणी बाजार समितीची खुली अकृषिक जमीन आहे.या जमिनीवर कर्मचाऱ्यांचा डोळा असून या जमिनीतील प्लॉट आम्हाला द्या अशी गळ सध्या कर्मचाऱ्यांनी सभापती तथा सभापतीच्या हितातील संचालकांजवळ घातली असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.दरम्यान

हाच विषय घेऊन बाजार समितीमध्ये नुकत्याच झालेल्या मासीक सभेत सभापतींनी हा विषय चर्चेत घेतला. विशेषतः महागाव बाजार समितीत सध्या ड,वर्गात गेली आहे.बाजार समितीची सध्या दिवाळखोरी कडे वाटचाल करीत आहे असे म्हटल्यास वागे ठरू नये.

कर्मचाऱ्यांनी मागितलेल्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवानाचा विषय असल्याचे बोलले जाते.याबाबत अनेक संचालकांची संपर्क केला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. खरे तर आजमितीस बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पगारचा ही खर्च करू शकत नाही.यापूर्वी काही संचालकांनी लाखोंचा अपहार होत असल्याची उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली आहे. बाजार समितीमध्ये संचालकांनी चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली होती त्यावरून गैरव्यवहार शेषपावती पुस्तकासह तपासणी करिता नियुक्त करण्यात आली. या समितीने चौकशी करून तसा अहवाल येत्या सहा तारखेला संचालक मंडळासमोर मांडणार असल्याचे माहिती आहे.

कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्लॉटमध्ये कर्मचाऱ्यांकडून ७५ पेटींची तरतूद केली असल्याचे बोलल्या जाते.आता हा नुकताच मलिदा कोण ? कोण लाटणार यामध्ये येत्या सभेमध्ये कोण कोण संचालक या विषयाला विरोध करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

बाजार समितीचा खर्च अधिक व उत्पन्न कमी या स्थितीने बाजार समिती आर्थिक परिस्थिती पूर्णतः बिघडली आहे. व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या शेष तो जशास तसा बाजार समितीच्या खजिन्यात आणि बँक खात्यात नाममात्र जमा होतो. कर्मचाऱ्यांचे पगारीची वणवण असताना आता तेच कर्मचारी यासाठी अंतर्गत लाखोंची बोली लावत आहेत.आणि कर्मचाऱ्यांना बाजार समिती प्लॉट देऊ शकते का ? बाजार समितीने कर्मचाऱ्यांना कमी दरात प्लॉट देणे सहकारातील नीकस असले तरी त्यामध्ये कर्मचारी सेवानिवृत्ती पर्यंत त्यांची सेवा असणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांना प्लॉट देण्याचा घाट रचल्या जात आहे त्या कर्मचाऱ्यांना केवळ चार या पाच या पुढे एखादी दोन वर्ष असू शकते अशी त्यांची नियुक्ती आहे. बाजार समिती दिवाळखोरीच्या वाटेवर व बाजार समिती ड दर्जामध्ये गेल्याने कुणालाही असा व्यवहार करणे कायदेशीर नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधी बोलून दाखविले.या सर्व व्यवहारांमध्ये बाजार समितीचे मुख्य पदाधिकारी तथा त्यांच्या मर्जीतील काही काहीच संचालक सोबत असल्याचे बोलले जाते.अनेक संचालकांनी ज्यावेळेस हा विषय मासिक सभेत घेतला त्यावेळेस याला विरोधी झाला. आता बघूया येत्या सहा तारखेला सभा होत असल्याचे कळते त्यात काय होते हे पाहणे गरजेचे आहे.

Copyright ©