Breaking News यवतमाळ

चिल्ली येथील दरोड्यातील दोन आरोपींनी अटक

महागाव ता . प्र निलेश नरवाडे

चिल्ली येथील दरोड्यातील दोन आरोपींनी अटक

स्थानिक गुन्हे शाखा व महागांव पोलोसांची कार्यवाही

महागाव तालुक्यातील चिल्ली ईजारा शेतशीवारात

बहुचर्चित दरोडा प्रकरणातील आणखी दोन आरोपींना गुरुवार दि.१ऑगस्ट रोजी धोबीघाट उल्हासनगर ठाणे येथून महागांव पोलीस व एलसीबीच्या पथकाने अटक केली. चंदू लक्ष्मण राऊत वय-३० वर्ष व राजू भिमराव देवकर वय-२८ वर्ष दोन्ही रा. गंगानगर किनवट जि. नांदेड असे अटक करण्यात आलेले आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहिती नुसार काही महिन्यापूर्वी महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा शेतशीवारात अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी घरातील सोने चांदी व नगदी असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून घरातील महिलांवर धारधार शस्त्राने हल्ला करून पळ काढला होता. या दरोड्यातील काही आरोपींना या पुर्वीच अटक करण्यात आली होती. व उर्वरीत आरोपींचा शोध घेणे करता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अनेक पथके तयार केले होते. ते पथक मागील काही दिवसांपासून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान सदर आरोपींचा मुंबई, ठाणे येथे शोध घेत आसतांना सदर आरोपी हे धोबीघाट उल्हासनगर येथे आपले नातेवाईकांना भेटण्यास येणार आसल्याची गोपनीय माहिती पथकांस प्राप्त झाल्याने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर परिसरात सापळा रचून, पोलीस कौशल्याचा वापर करून, पथकाने अतिशय शिताफीने दोंन्ही आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी महागांव पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,‌ उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकाते, महागांवचे ठाणेदार धनराज निळे यांचे मार्गदर्शनात शरद लोहकरे, सागर अननमवार, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, संतोष जाधव, शेख हबीब, यांनी पार पाडली.

Copyright ©