यवतमाळ सामाजिक

जगविख्यात साहित्यसम्राट,साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन

जगविख्यात साहित्यसम्राट,साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन

यवतमाळ शहरातील स्थानिक नेताजी नगर चौक,यवतमाळ या ठिकाणी साहित्यरत्न,लोकशाहीर,प्रसिद्ध कादंबरीकार,अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीच् औचित्य साधून सार्वजनिक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती,नेताजी नगर चौक, यवतमाळ यांच्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित नागरिकांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.अण्णाभाऊ साठे हे ईथल्या प्रस्थापित व्यवस्थे विरुध्द बंड पूकारणारे खरे साहित्यिक होते अशे प्रतिपादन प्रा.पंढरी पाठे यांनी केले.दरम्यान सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष कांबळे,सचिव सुनील हिवराळे,मार्गदर्शक गजानन वानखडे,सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे,संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर,किशोर शिंदे,किसनराव जोगदंडे,सदस्य नरेंद्र लांडगे,राजेश चव्हाण,रोहित वानखडे,विजय कांबळे,शाम खडसे,किशोर शिंदे,संजय वानखडे,मिराबाई कांबळे,सुनीता कांबळे, रेखा लोंडे,व इत्यादी नेताजी नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©