महाराष्ट्र सामाजिक

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिकस शिबीर 04 आगस्ट ला भद्रावती येथे

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिकस शिबीर 04 आगस्ट ला भद्रावती येथे

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र शासन पुणे, व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन द्वारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र अमेच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशन च्या तांत्रिक सहयोगाने चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशन द्वारा चतुर्थ जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण शिबिर चे आयोजन दिनांक 04 आगस्ट 2024 रोज रविवार ला स्थानिक तालुका क्रीडा संकुल ,भद्रावती येथे करण्यात आलेले आहे असे जिल्हा असोसिएशन चे संस्थापक व सचिव तसेच कॅम्प चे मुख्य आयोजक दुर्गराज एन रामटेके यांनी प्रसिद्धीस दिलेलें आहे.

विश्वातील सर्व क्रीडा प्रकाराची जननी म्हणून ओळखले जाणारे जिम्नॅस्टिकस या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारचा चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण भागात विविध तालुका मध्ये प्रसार करण्याच्या एकमाञ उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी मा. अविनाश जी पुंड सर व तालुका क्रीडा अधिकारी मा. सौ.जयश्री देवकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या शिबिरात प्रमुख तांत्रिक मार्गदर्शक रूपाने इंटरनॅशनल कोच प्रा.संजय हिरोडे सर( श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती), श्री मुकेश घ्यार सर(कोच -शासकीय विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर,नागपुर, GAN),कु.प्राची पारखी मॅडम(इंटरनॅशनल मेडलिस्ट व इंटरनॅशनल लेवल 01 जिम्नॅस्टिकस कोच) यांना निमंत्रित करण्यात आले आहे .

या जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिकस कॅम्प मध्ये जिल्ह्यातील 04 ते 25 वयोगटातील सर्व शालेय व महाविद्यालयीन मुला मुलींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आव्हान चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष गयनेवार,चेअरमन निलेश गुंडावार, उपाध्यक्ष ऍड राजरत्न पथाडे,संस्थापक व सचिव दुर्गराज एन रामटेके,बंडू करमणकर,सॅम मानकर,संजय माटे, संदीप पंधरे, पांडुरंग भोयर, गौतम भगत,सचिन नारायने, श्रीहरी गॅसकांटी, शंभु वाघमारे,क्रिश भोसकर, कु पलक शर्मा,कु.आयुषी रामटेके,कु.ऋतुजा माटे,कु.आर्या कामरे,कु. तंनू आडे,कु.प्रियंका मांढरे यांनी केलेले आहे.

Copyright ©