महागाव ता .प्र . निलेश नरवाडे
अवजड वाहनामुळे शाळेच्या रस्त्यावर पडले खड्डे
चिखला पाण्यातून शोधावा लागतो रस्ता
दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी चलो हम स्कूल चले असा नारा दिला आणि ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पक्के रस्ते बांधून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याच्या मार्ग सुखकर केला होता. परंतु 15 वर्षा पूर्वीचे रस्ते त्यांची दुरुस्ती नसल्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. दस्तुरखुद महागाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अगदी समोरून जाणाऱ्या रस्त्याची अशीच दयनीय अवस्था झाली आहे. तब्बल पाच शाळांना जाणारा हा मार्ग आहे.एक किलोमीटरच्या आतील अंतर असणाऱ्या हा रस्ता आहे. या परिसरात बंजारा वस्ती व बिरसा मुंडा कॉलनी आहे. विशेष म्हणजे शाळा व वस्ती असणाऱ्या परिसराला वीट भट्ट्यांचा विळखा आहे .या परिसरात आठ ते दहा वीट कारखाने आहेत . या वीट कारखान्यांच्या अवजड वाहनांने रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे झाले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे आपल्या पाल्यांना शाळेत सोडताना पालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे तर स्कूल बसच्या वाहनाचे खड्ड्यांमुळे प्रचंड नुकसान होत आहे.
वीट कारखान्यांना लागणारा कच्चामाल ,कोळसा ,मळी व पक्क्या विटांची विक्री करणारी वाहने आणि त्यावरही कळस म्हणजे रात्रीच्या वेळेस शासकीय मुलींची शाळा व वस्तीगृहास लागून असणाऱ्या पुनर्वसन जागेतील जेसीपी ने मुरूम खोदून दहा ते बारा ट्रॅक्टर ने रात्रीला याच रस्त्यावरून गौण खनिज नेहमी चोरी केली जाते . या सर्व अवैद्य बाबींचा विचार केला असता रस्त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेली बरी अशा या जीवघेण्या मार्गावरून शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज मार्गक्रमण करावे लागत आहे .
हा रस्ता पूर्वी पांधण रस्ता होता . 15 वर्षांपूर्वी या भागात मुलींची शासकीय निवासी शाळा झाल्यामुळे मुख्य रस्त्यापासून शाळेपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. महागाव शहराचा हा डेव्हलपमेंट एरिया असल्यामुळे या भागास महत्त्व आले.या परिसरात टेक्निकल हायस्कूल, अपंग विद्यालय , रामभाऊ कोसलगे विद्यालय, एल के इंग्लिश स्कूल अशा एकूण पाच शाळा आहेत. हा मार्ग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शैक्षणिक मार्ग आहे परंतु खड्डे आणि चिखलामुळे रस्त्यावरून चालणे सुद्धा अवघड होऊन बसले असल्याने विद्यार्थ्यांचा विद्या संपादनाचा मार्ग खडतर बनला आहे . चलो हम स्कूल चले हे दिवस बदलले आहे. महसूल विभागाच्या भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांच्या मर्जीने वस्ती व शाळेच्या परिसरात वीटभट्ट्यांना परवानगी दिल्यामुळे रस्त्याची अशी दुरावस्था झाली आहे . असे जनतेचे स्पष्ट मत आहे.अधिकाऱ्यांची मर्जी आज मीतिला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पथ्यावर पडली असा असंतोष जनतेत व्यक्त केल्या जात आहे.
Add Comment