यवतमाळ सामाजिक

यशदा प्रशिक्षण संस्था पुणे येथे महागाव तालुक्यातील तीन महिला सरपंचांची झाली निवड

महागाव ता .प्र. निलेश नरवाडे

यशदा प्रशिक्षण संस्था पुणे येथे महागाव तालुक्यातील तीन महिला सरपंचांची झाली निवड

शासनाच्या नामांकित प्रशिक्षण संस्था यशदा पुणे या ठिकाणी महागाव तालुक्यातील तीन महिला सरपंचांची प्रशिक्षणाकरिता झाली निवड सौ ज्योती गणेशराव वानखेडे उटी सरपंच सौ जयश्री पांडुरंग चव्हाण भोसा सरपंच सौ पुष्पा पंडित कांबळे गुंज सरपंच त्या सरपंचांना ग्रामीण विकासाशी संबंधित विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महिलांचा सहभाग वाढून महिला सक्षमीकरण साठी पोषक वातावरण निर्मिती व्हावी तसेच शाश्वत विकास ध्येयाच्या स्थानिकीकरणातून महिला स्नेही पंचायतीची संख्या वृद्धिंगत होण्यासाठी जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महिला सरपंच यांची निवड करण्यात आली त्याबद्दल सरपंच संघटना महागाव अध्यक्ष अमोल भाऊ चिकणे यांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला व महिलांना सरपंच यांना शुभेच्छा प्रदान केल्या

Copyright ©