ता.प्र.निलेश नरवाडे
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व नवभारत प्राथमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह स्थानिक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच नवभारत प्राथमिक विद्यालय महागाव येथे उत्साहात संपन्न झाला.
या सप्ताहांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 22 रोजी अध्ययन अध्यापन साहित्य यांचा वापर, दिनांक 23 रोजी गणित या विषयाच्या मूलभूत संज्ञा विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या. दिनांक 24रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या, दिनांक 25 रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,.
विद्यार्थ्यांमध्ये व्यापारी दृष्टिकोन रुजावा म्हणून आनंद मेळाव्याचे आयोजन करून, खरेदी विक्री व त्यामध्ये होणारा नफा तोटा याबद्दलची जाणीव जागृती करण्यात आली. दिनांक 27 रोजी विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले ,तसेच दिनांक 28 समुदाय सहभाग दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना पोषण आहारासोबत मिष्ठांन भोजन देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी व्यवस्थापक संभाजीराव नरवाडे हे संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राचार्य रंजना धामणकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले
Add Comment