यवतमाळ सामाजिक

हिवरी सर्कल मधील संतत धार मुसळधार पावसाने पिके गेली वाहून,तर काही सडली 

हिवरी सर्कल मधील संतत धार मुसळधार पावसाने पिके गेली वाहून,तर काही सडली 

यवतमाळ तालुक्या अंतर्गत हिवरी येथील मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून अनेकांची पिके सडली तर 30 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांचे पिके वाहून निघाली यात सोयाबीन,कापूस तूर तर काहींचा भाजी पाला निकामी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे मागील  आठवड्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने प्रत्येकांनी पिके पिवळी पडली तर काहींची सडली यातच अचानक मुसळधार पाऊस आल्याने काहीचे शेत खरडून गेली तर काहीचे पिके झोपली,तर आजही काहीच्या शेतात तलावाचे स्वरूप दिसून येत आहे शासनाने तातडीने मदत देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व सानुग्रह निधीचे तात्काळ वाटप करावे अशी मागणी शेतकरी वर्गा कडून करण्यात येत आहे.त्या मुळे शेतकऱ्यानं काही प्रमाणात दिलासा तरी मिळेल कारण सतत पाऊस असल्याने काहीचे शेतात पिकापेक्षा गवतच दिसून येत आहे शेतात निदन करण्यासाठी मजूर हि मिळेनासे झाले आहे जादा मजुरी देऊनही कुणी येण्यास तयार नाही या मध्ये याची तातडीने दखल घेऊन मदत देण्याची मागणी करण्यात येत  आहे

Copyright ©