यवतमाळ सामाजिक

याही वर्षी हिवरीकरांवर पुराचे संकट 

याही वर्षी हिवरीकरांवर पुराचे संकट 

जिल्हा अधिकारी यांचे कडे नाला सुरक्षा भिंतीचे व रुंदी करणाचा प्रस्ताव धूळखात

यवतमाळ तालुक्यातील हिवरी हे गाव अनेक वर्षा पासून पूर ग्रस्त म्हणून परिचित आहे येथील गावाची मंत्री पालक मंत्री आमदार सचिवांनी हि पाहणी केली परंतु कुणीही याची दखल घेतली नाही मागील वर्षी जवळ पास 100 घरात पाणी गेले यातील एकाही पुरपिडीताला एकही रुपया मिळाला नाही राखीव निधी साठी ग्रामपंचायत यांनी आमदार यांच्या शिफारशींवरून प्रस्ताव सादर करण्यात आला अभियंता यांची एक टीम येऊन पाहणी केली प्रस्ताव दाखल केला मात्र कोणत्याही प्रकारची मान्यता त्या प्रस्तावास देण्यात आली नाही आज पुनः तीच वेळ नाल्या काठावरील हिवरी ग्रामस्थांवर येत आहे आज केवळ अर्धा तास पाऊस आल्याने पुराचे पाणी अनेकांच्या घरातील दरवाज्याने टेकले हा जर पाऊस एक तास आला असता तर अनेकांचे घर पाण्यात गेले असते.थोड जरी पाऊस आल्यास अनेकांना रात्र जागून काढावी लागते हि बाब अत्यंत गंभीर असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष केल्या जाते येथील तातडीने सुरक्षा भिंत व पुलाचे काम केल्यास अनर्थ टळू शकतो पूर आला की मजूर ,शाळकरी विद्यार्थांना जीव मुठीत घेऊन पुरामधून पायवाट काढावी लागते.आता तरी प्रशासन लक्ष देईल का कि दुर्घटना घडल्या वर जाग येईल असा सवाल ग्रामस्थांन कडून करण्यात येत आहे

Copyright ©