यवतमाळ शैक्षणिक

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरली. ” शाळा ” बसण्यासाठी वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात 

महागाव ता. प्र.निलेश नरवाडे 

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरली. ” शाळा ” बसण्यासाठी वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात 

तालुक्यातील अंबोडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नसल्याने संतप्त पालकांनी

आपल्या मुलांना घेवून गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक दिली.याच कार्यालयात विद्यार्थ्यांनी आपली भरवली.त्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली.

महागाव तालुक्यात शिक्षण विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे.एकीकडे विद्यार्थी असताना शिक्षक नाहीत तर दुसरीकडे विद्यार्थी असून वर्गखोल्या नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओसाड पडत आहेत. दोन वर्षापूर्वी अंबोडा येथील जीर्ण अवस्थेत आलेल्या जिल्हा परिषद उर्दु शाळेची खोली पाडण्यात आली.नव्याने वर्ग खोली बांधण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले .परंतु दोन वर्षात वर्ग खोल्या बांधण्यात आल्या नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी आज (ता.२९) गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आपल्या पाल्यांना घेवून शाळा भरवली.यावेळी गट शिक्षणाधिकारी यांच्यासोबत संदीप ठाकरे ,(मा. पंचायत समिती सदस्य )विनोद राऊत (पाटील ), देवानंद पाटील , प्रवीण राऊत , जिल्हा परिषद उर्दु शाळेचे अध्यक्ष जिलानी शेख रज्जाक, ताहेर मौलाना ,यांनी चर्चा करून गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी तत्काळ जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने पालकांनी आपल्या मुलांना घेवून आंदोलन मागे घेतले.यावेळी शेख असिफ शेख बब्बर, जमीर खान ,आजिम खा , बंडू वाघमारे, बाबारावजी पाटे, रज्जा खा उस्मान खान , शेख आसिफ, पंजाब करपे ,प्रमोद मिराशे, देवानंद गरडे ,आदी उपस्थित होते.

Copyright ©