यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषदेवर आयटक आशा संघटनेचा छत्री मोर्चा

जिल्हा परिषदेवर आयटक आशा संघटनेचा छत्री मोर्चा

(शासन निर्णयाची अंमलबजावणी करा)

आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटना जिल्हा शाखा यवतमाळ वतीने दि.२९ -०७-२०२४ रोजी स्थानिक श्रमशक्ती भवन येथुन यवतमाळ जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा भर पावसात काढण्यात आला मोर्चात घोषणा देत शहर वाशीयांचे लक्ष केंद्रित करत संविधान चौक, नेताजी चौक , नेताजी मार्केट मार्गे , दत्त चौकातुन जुना बसस्थानक मार्गे जिल्हा परिषदेवर धडकला

राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे मार्फत मा.प्रंतप्रधान ,भारत सरकार ,नई दिल्ली व मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आले, त्यात म्हटले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र सरकारने सन २०१५ पासून आशां स्वयंसेविकांचा मानधनात आर्थिक वाढ केलेली नाही तेव्हा केंद्र सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात राज्य सरकार येवढी दरमहा रू.१०,०००/- मानधन वाढ करावी तसेच राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात केलेली वाढ ही पुर्वी चार (४) हेडवर‌ दिली जात होती तीच वाढ आता अठरा (१८) हेडखाली देण्याचे पत्रक काढले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांवर हा अन्यायच झालेला आहे ; महाराष्ट्रातील आशाच्या मनात शासनाप्रती नाराजी निर्माण झाली आहे. तेव्हा शासनाने ह्या बाबत फेरविचार करून पुर्वीप्रमाने चार (४) हेडवरच मानधन वाढ देण्यात यावी अशी मागणी आहे. राज्य शासनाचे निर्णया प्रमाणे जिल्हात अंमलबजावणी झालेली नाही तेव्हा तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, व थकीत मानधन अदा करावे मागण्या,केंद्र सरकारने सन २०१५ पासून आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ केलेली नाही तेव्हा महाराष्ट्रात सरकार येवढी मानधन वाढ केंद्र सरकारने द्यावी., महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रंमाक: आशा – ५६२३/प्र.क.५३५/आरोग्य -७ दि.१४ मार्च २०२४ नुसार नोव्हेंबर २०२३ पासून मानधन अदा करा व फरक बिलाची रक्कम द्या., केंद्र सरकारचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पीआयपी नुसार पुर्वी राज्य सरकारची‌ मानधन वाढ प्रथम चार( ४ )हेडवर देत होते त्यात बदल करून आता अठरा (१८)हेडवर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे हा आशा स्वयंसेविकांच्यावर अन्याय आहे तेव्हा याबाबत फेर विचार करून चार (४)हेडवरच मानधन वाढ देण्यात यावी., राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांना दिवाळी भाऊबीज देण्याची घोषणा केली परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित केलेला नाही तेव्हा शासन निर्णय निर्गमित करून भाऊबीज देण्यात यावी.,राआअ वेतन चिठ्ठी परीपत्रक दि.२४ जानेवारी २०२३ नुसार आशा स्वयंसेविकांना वेतन चिठ्ठी जिल्हात अद्याप दिली जात नाही तेव्हा जिल्हास्तरावरून दरमहा वेतन चिठ्ठी देण्याचे संबंधितांना आदेश करावेत., आरोग्य वर्धनीचे मानधन दर महिन्याला देण्यात यावे, शासन निर्णय क्रंमाक : आशा – ५६२४/प्र.क.२२७/आरोग्य -७ दि.५ जुन २०२४ नुसार एप्रिल मे जून मानधन देण्यात यावे म्हटले आहे आणि आता शासन निर्णय क्रंमाक : – आशा -५६२४ प्र.क्र.२२७/आरोग्य-७ दि.२२जुलै २०२४ नुसार मे ते जून या दोन महीण्याचे मानधन द्या म्हटले आहे तेव्हा हे दोन्ही जिआर वाचुन तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आल्या यावेळी, कॉ.विजय ठाकरे, कॉ.दिवाकर नागपुरे, कॉ.सुनिता कुंभारे,कॉ.माला इंगोले , विजया आत्राम, सुनिता सोनटक्के, राधाबाई लीखेवार , सविता सीडाम, नंदा मुके ,सुजाता पुणेकर, शुभांगी सीमरत , स्वाती गीरी,जासमीन शेख, अनिता अर्के , सुषमा कुळमेथे, रेखा होले, किरण कांबळे, उज्वला पाझारे, ममता क्षिरसागर, संजीवनी पिंपळकर ,शैला पोहणकर ,प्रभा मुरके ,‌ शोभा नागोशे, विजया तायडे, चंदा जयस्वाल , वंदना धुर्वे,सारीखा येरमे, माया मरस्कोले, कविता कायापाक , विजया तायडे, नलीनी काळे, बेबी भारती, सिमा देवतळे, संध्या कातकीडे, गंगाबाई घुमे, समशाद पठाण,योगीता हेमने, ज्योत्स्ना दूधे, माया इंगोले, राखी पवार, गीता जाधव, शिला भगत, अर्चना माघाडे, चंचल केदार,छाया राठोड,अल्का पैठणकर, शोभा राहुलवाड , सुरेखा रणविर , अरूणा शींदे, सत्यभामा पवार, कांता खरवडे, संगीता आडे, अंजना कुरकुटे, विजया शेखावत,शिल्पा राठोड,कीरण राठोड, शुभांगी सुकळकर ,शालीनी डोके, उषा पांडोळे, माया ठमके, शांता हुलगुंडे , वर्षा वानखडे,बबीता चिंचोळे,गुंफा गेडाम ,रेखा मुधाने,वर्षा इंगोले, छबुताई इंगोले, वंदना लोणारे, ज्योती राऊत, शोभा निमकर ,मीरा चक्रनारायन, मंगला बल्की, अंजु तुमराम , ज्योती गुडेवार, सुनंदा कांबळे, सुनिता जयस्वाल, रंजना वानखडे, रंजना राऊत, सविता बरडे, छाया खडककर , माया सातपुते, मंगला राखुडे, हेमलता पांडे ,गौरी उजवने, शिंदु गुरनुले, साधना भगत , कुंजमाला सहस्त्रबुद्धे, अर्चना झीले, , सविता वाघमारे, सविता आत्राम, मनीषा पेंदोर , शुभांगी पवार, सुकेशणी हरवले, विद्या लेंडे, अनुसया पुराम, शीला पाटील, सुनिता घारेकर , अर्चना कडू ,शालु मानकर ह्या सह शेकडो महिला उपस्थित होत्या

Copyright ©