जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने “उत्सव समितीचे गठण”
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सात सर्व आदिवासी बांधावातर्फे साजरा करण्यात येतो . याकरिता दरवर्षी सर्व समाज संघटनांच्या वतीने जागतिक आदिवासी उत्सव समितीचे गठण करण्यात येते. दिनांक २० जुलै रोजी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ सिंघानिय नगर येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नरेशभाऊ गेडाम यांची समिती अध्यक्ष तर नेशनल आदिवासी यूथ एसोसिएशन चे राष्ट्रीय सचिव अरविंद मडावी यांची सचिव पदी नर्वानुमते निवड करण्यात आली. तर ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईस फेडरेशन चे शंकरराव कोटनाके यांची कोशाध्यक्ष म्हणून निवड झाली. कार्याध्यक्ष तुषार आत्राम, उपाध्यक्ष बाळूभाऊ वट्टी, राहुल मेश्राम निवड झाली. प्रसिद्धी प्रमुख म्हणूम कृष्णाभाऊ पुसनाके,भारत गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली.
जागतिक आदिवासी दिनी बाईक रैली, ८५% च्या वर गुण संपन्न करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार, प्रबोधन कार्यक्रम घेण्याचे ठरले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईस फेडरेशन चे राज्य उपाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे होते तर प्रमुख उपस्थिती ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईस फेडरेशन चे कार्याध्यक्ष सुरेशराव कन्नाके, सौ रेखाताई कन्नाके, शेखर मडावी, प्रल्हाद सीडाम, होते. प्रास्ताविकेत मागील वर्षाचे समिती अध्यक्ष प्रा. निनाद सूरपाम यांनी जन आक्रोश मोर्चा समितीचे वतीने कसा यशस्वी झाला याची माहिती देऊन मागील वर्षीचा लेखाजोखा सादर केला. नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अढतक्ष गुलाबराव कुडमेथे यांनी अध्यक्षीय भाषणातून नवनिर्वांचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले . होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनी कार्यक्रमात आदिवासी संस्कृती जतन संवर्धन, आदिवासी विरोधी शासन निर्णय निषेध, आदिवासी कल्याणकारी उपक्रम, आदिवासी क्रांतिकारकांचा कार्यास उजाळा, आदि विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त समिती अध्यक्ष नरेशभाऊ गेडाम यांना अध्यक्षपद मिळाल्याने समाजाचे आभार मानले आणि यशस्वी कार्यक्रम करून दाखवण्याची ग्वाही दिली.
संचालन प्रा निनाद सुरपाम यांनी तर आभार अरविंद मडावी यांनी मानले. समिती बैठकीमध्ये शरद उईके , विजय गेडाम , सचिन मडावी,सुरेश वेलादे, राहुल कुमरे , जुमनाके साहेब, स्वप्नील मसराम, राजेश मडावी, सुभाष गेडाम, कुळसेंगे साहेब, व सर्व संघटनांचे पधाधिकारी उपस्थित होते.असे प्रसिद्धी प्रमुख कृष्णा पुसनाके यांनी कळविले आहेत.
Add Comment