यवतमाळ सामाजिक

माजी शिक्षण मंत्री बांधावर,तर विद्यमान आमदार नॉट रीचेबल

माजी शिक्षण मंत्री बांधावर,तर विद्यमान आमदार नॉट रीचेबल

कळंब तालुक्यातील जोडमोहा परिसरातील गावातील नदीच्या महापूराने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली असून, रात्री पासुन व सकाळी ज़ोरदार पावसाने हजेरी लावली येथील सततच्या मुसळधार पावसाने जोडमोहा येथुन वाहनारी वाघाड़ी नदी दुथडी भरुन वाहत असल्यामुळे नदीच्या आजूबाजुला असलेले शेत खरडून गेली तर अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारा घास नियती हिरावू घेतला हे वृत्त पत्रकारशक्ती पोर्टला प्रकाशित होताच माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी बातमी ची दखल घेत थेट जोडमोहा येथील शेतकऱ्यासोबत तातडीने भेट घेऊन त्याच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाडाच वाचला माजी मंत्री वसंतराव पुरके यांना माहिती दिली त्या मध्ये मागील पीक नुसकान भरपाई अजूनही मिळालीच नाही असे सांगताच त्यांनी लगेच कळंब तालुक्यातील नायब तहसीलदार यांना फोन करून शेतकऱ्याची व्यथा सांगितली तहसीलदार यांनी दखल घेत शेतकऱ्यांचे समाधान केले व आम्ही शेतकऱ्यांचे पैसे व ज्या शेतकऱ्याची के. वाय सी.झाले असेल त्यांना निधी आले की त्याची खात्या मध्ये जमा केल्या जाईल उत्तर देण्यात आले या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची यादी तलाठी मार्फत कळंब तहसील यांना पाठवल्या जाइल,असेही सांगण्यात आले मात्र विद्यमान आमदार यांना बहुमताने निवडून दिले जेणे करून शेतकऱ्यांच्या संकटात येईल म्हणून मात्र येथील शेतकऱ्यांच्या दुःखावर फंकरही मारायला वेळ नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.येथील वाघाडी नदीसह अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर येऊन अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेले असून, सोयाबीन तथा कापसाचे पीक सडण्याच्या मार्गावर आहेत,या साठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे परिसरामध्ये कितीतरी अल्पभूधारक शेतकरी आहे ज्यांचा कुटुंबाचं आर्थिक नियोजन सगळ्याप्रकारे विस्कळीत झालेला आहे भरपाईचे त्वरित पंचनामे करावे. जोडमोहा येथील शेतकरी हा अल्पभूधारक शेतकऱ्याकडे शेती आहे.या वेळी जोडमोहा शेतकरी काशिनाथ लखुजी आडे, पार्वताबाई नेवारे, जनार्दन नेवारे, विष्णू लिल्हारे, दिपक येबळवार, घनश्याम लिल्हारे सुखदेव लिल्हारे, दवडू राठोड, राजू लिल्हारे, विजय लिल्हारे, रमेश जयस्वाल, अशोकुमार जयस्वाल, किसान लिल्हारे, कैलास लिल्हारे, बाबुलाल पवार, सुभाष आडे, सुदाम आडे, मुकेश लिल्हारे, हरीश लिल्हारे, मुकेश नथुजी लिलारे किसन लिलारे परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©