यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र पोलीस मध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड

महाराष्ट्र पोलीस मध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड

हिवरी येथील सामान्य कुटुंबातील अमित ठाकरे व चैताली कोहरे यांनी अपार परिश्रम घेऊन महाराष्ट्र पोलीस मध्ये यश संपादन केले हिवरी येथील दोन विद्यार्थ्यांनी आई वडिलाचे व गावाचे नाव लौकिक केले त्यांना हिवरी ग्रामपंचायत तथा ग्रामवाशियान कडून मानाचा मुजरा करीत त्यांचा व त्यांच्या पालकांचा घरी जाऊन सन्मान करण्यात आला याच यशाला आणखी प्रगती पथावर न्याव त्या निमित्त या दोन्ही विद्यार्थ्यांनी  अशीच प्रगती करावी व प्रत्येक तरुण तरुणींनी असेच यश संपादन करावे या करिता ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सत्कार करून  शुभेच्छा देण्यात आल्या चैताली हीचे वडील विलास कोहरे लाकूड कटाईचे काम करतात तर आई मिळेल त्याच्या शेतात मजुरी करते यांना दोन मुली एक मुलगा असून ज्या दिवशी यांना सुट्टी असे तर सर्वच मजुरीला जातात अशातच चैतालीने परिश्रमातून यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे तर अमित याचे वडील खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करते यांच्या या यशाने गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला या वेळी सध्याताई अतकरी, अनंत राऊत,संदीप खोडकुंभे,विठोबा कोडापे,ओंकार चेके कांता भिडीकर,सुनिता जैस्वाल प्रामुख्यानं उपस्थित होते

Copyright ©