Breaking News यवतमाळ

जोडमोहा येते मुसळधार पावसाचा तांडव ! हजारो हेक्टर शेती पाण्या खाली

जोडमोहा येते मुसळधार पावसाचा तांडव ! हजारो हेक्टर शेती पाण्या खाली

कळंब तालुक्यातील जोडमोहा परिसरातील गावातील नदीच्या महापूराने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली असून, रात्री पासुन व सकाळी ज़ोरदार पावसाने हजेरी लावली जोडमोहा येथुन वाहनारी वाघाड़ी नदी दुथडी भरुन वाहत असल्यमुळे नदीच्या आजूबाजुला असलेले शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारा घास नियती हिरावू पाहत असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहेत, त्यामुळे पिके चांगली होण्यासाठी पावसाने उघडझाप देण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे, मागील आठवडाभरापासून चालू असलेला पाऊस थांबयचा काही नाव घेत नाही आहे, सतत पाऊस येत असल्यामुळे परिसरातील वाधाडी नदीसह अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर येऊन अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेले असून, सोयाबीन तथा कापसाचे पीक सडण्याच्या मार्गावर आहेत, मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, पावसामुळे पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे, शिवाय उत्पन्नात घट येण्याची भीती सुद्धा शेतकऱ्यांना सतावत आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे परिसरामध्ये कितीतरी अल्पभूधारक शेतकरी आहे ज्यांचा कुटुंबाचं आर्थिक नियोजन सगळ्याप्रकारे विस्कळीत झालेला आहे तरी प्रशासनाने सदर नुकसान भरपाईचे त्वरित पंचनामा करावा. जोडमोहा येथील शेतकरी काशिनाथ लखुजी आडे पार्वता बाई नेवारे जनार्दन नेवारे, विष्णू लिल्हारे, दिपक येबळवार, घनश्याम लिल्हारे सुखदेव लिल्हारे, दवडू राठोड, राजू लिल्हारे, विजय लिल्हारे, रमेश जयस्वाल, अशोकुमार जयस्वाल, किसान लिल्हारे, कैलास लिल्हारे, बाबुलाल पवार,सुभाष आडे, सुदाम आडे, मुकेश लिल्हारे, हरीश लिल्हारे या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे शेती आहे. शेत हे गावाजवळून जाणाऱ्या नाल्याला लागून आहे. सलग तीन वर्षा पासून होणाऱ्या पावसामुळे नदी फुटल्याने पूर्ण शेती वाहून जाते तोंडी आलेला घास नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने सदर शेतकरी हवालदिल झालेलं आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना सरकार पण या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे. काशिनाथ लखुजी आडे यांच्या वर बँक ऑफ बडोदा चे कर्ज आहे व ईतर शेतकरी यांचावर कर्जाची टागती तलवार आहे मागच्या दोन वर्षा पासून पूर जात असल्या कारणाने बँक च कर्ज सुद्धा भारता आलेल नाही आणि थकीत कर्ज झाल्यामुळे बँक ने पण कर्ज दिलेलं नाही. या वर्षी पीक जोमात आलेल असताना अतिवृष्टी झाल्याने सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण शेत पाण्यात वाहून गेलं आहे. या वर्षी तरी नशीब आणि मायबाप सरकार मदत करेल या सावकाराकडून कर्ज काढलं पण पुन्हा पूर गेल्यामूळे या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही. आयुष्यच राहदगडग एवढं सगळं चालायचं कस त्यात मुलाचं पुढील शिक्षण सावकारक च कर्ज आणि स्वतः च परिवार च पालनपोषण करयचा कस. या सगळ्या परिस्थितीत काशिनाथ लखुजी आडे रा जोडमोहा या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्या शिवाय कोणताही पर्याय उरलेले नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी सदर वाघाडी नदी याचे रुंदीकरण आणि खोलीकरण यासाठी आमदार यांनी जोडमोहा ग्रामपंचायत येथे तातडीने बैठक घेतली होती त्या मध्ये जोडमोहा येथील संपूर्ण शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आमदारानेहवेत आस्वासने दिले तर नाही ना असा प्रश्न…? जोडमोहा येथील शेतकऱ्यांन मध्ये चर्चेला सुरवात होत आहे. शासनाकडून प्रस्ताव पाठवलेले असून सुद्धा जाग मात्र येईना प्रशासन भर्माची पुडी तर दिली नाही ना असे बोले जात आहे जोडमोहा येथिल शेतकरी यांनी पत्रकारशक्ती शी बोलतानी सांगिताले आहे त्यामुळे संबंधित विभागाने नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी पुरग्रस्त शेतकरी काशिनाथ लखुजी आडे, पार्वताबाई नेवारे, जनार्दन नेवारे, विष्णू लिल्हारे, दिपक येबळवार, घनश्याम लिल्हारे सुखदेव लिल्हारे, दवडू राठोड, राजू लिल्हारे, विजय लिल्हारे, रमेश जयस्वाल, अशोकुमार जयस्वाल, किसान लिल्हारे, कैलास लिल्हारे, बाबुलाल पवार, सुभाष आडे, सुदाम आडे, मुकेश लिल्हारे, हरीश लिल्हारे, मुकेश नथुजी लिलारे किसन लिलारे परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Copyright ©