यवतमाळ सामाजिक

ऐकलं गरजू महिलांना रोजगाराच्या सुवर्णं संधी उद्योजक शेळी पालन प्रशिक्षण संपन्न 

ऐकलं गरजू महिलांना रोजगाराच्या सुवर्णं संधी उद्योजक शेळी पालन प्रशिक्षण संपन्न 

यवतमाळ येथील सेवाभावी संस्था कलाकुंज बहुउद्देशिय महिला संस्था यवतमाळ तर्फे दि. १८जुलै २०२४ ते २५ जुलै २०२४ या दरम्यान टिळक स्मारक येथे रोजगार उद्योजक शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न. त्या उद्घाटन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उ‌द्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कमलेशजी तेल्हानी (कैलास मानस सरकारचे राज्य सचिव) हे होते तर मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवीणजी मसारकर, ना. अँड.मोहलीकजी कलाकुंज बहुउद्देशिय महिला संस्था चे सचिव दुर्गा पटले या होत्या.

 

रोजगार उद्योजक शेळी पालन प्रशिक्षणाचे सूत्र संचालन संदिपजी रोहणकर तर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्हा गट प्रमुख वर्षा इंगोले तालुका सहाय्यक सिमा तायडे वंदना काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन वर्षा देवतळे यांनी केले यांनी केले. तर आभार प्रदर्शन, वर्षा देवतळे यांनी केले. शेळी पालन उद्योग विकास प्रशिक्षण मध्ये ग्रामीण रोजगार उद्योजकांची ओळख, आधूनिक तंत्रज्ञान वापर, जागतिक बाजारपेठ व्यवसायाच्या मोठया आधूनिक उपाय योजना, शासनाच्या योजना, ग्रामीण रोजगार विकास इ. विषयावर प्रशिक्षकानी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये ग्रामीण भागातील मोहदा, माणिकवाडा, पाबळ, उमरी पठार, चिखली यवतमाळ इ. गावातील महिला, युवा वर्ग शेतकरी या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होते ..

Copyright ©