यवतमाळ सामाजिक

गोदाम उपलब्ध नसल्याने कडधान्याची खरेदी प्रक्रिया खोळंबली

महागाव ता.प्र. निलेश नरवाडे

गोदाम उपलब्ध नसल्याने कडधान्याची खरेदी प्रक्रिया खोळंबली

तालुका खरेदी-विक्री संघाला गोदाम उपलब्ध करून द्या !

५१ शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण

किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत हमीभावाने भरडधान्य ज्वारी खरेदी करिता तालुक्यात ५१ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये खरेदी विक्री संस्थेला जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी १३९० क्विंटल ची खरेदी करण्याची मर्यादा दिली आहे. तालुका खरेदी-विक्री संघाकडून भरडधान्य ज्वारी खरेदीची सुरुवात करायची आहे. परंतु तालुका खरेदी-विक्री संघाला गोदाम उपलब्ध नसल्याने तालुक्यात कडधान्याची खरेदी प्रक्रिया खोळंबली आहे. तालुका खरेदी-विक्री संघाने गोदाम उपलब्ध करून देण्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार सुद्धा केले आहे. तरीसुद्धा अद्यापही गोदाम उपलब्ध झाले नसल्याने ही संपूर्ण प्रक्रिया खोळंबली आहे. भरड धान्य ज्वारी खरेदी ची सुरुवात करण्यासाठी आम्हाला ताबडतोब गोदाम उपलब्ध करून द्या अशी मागणी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार, उपाध्यक्ष शुभांगी पवार, संचालक देविदास राठोड, पांडुरंग करपे, सीमा नरवाडे, माधवराव सुरोशे, हनवंतराव देशमुख, रोहिदास पाटे, दिगांबर राठोड, विजय राऊत, पंजाबराव सरदार, विद्या पाटील, वर्षा बाई राठोड, सतीश ठाकरे, बाबुराव व्हडगिरे यांनी केली आहे.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी संस्थेला १३९० क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा दिली असल्याने संपूर्ण शेतकऱ्यांची खरेदी होणार नाही. ऑनलाइन नोंदणी केलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची खरेदी करण्यासाठी मर्यादा वाढवून द्यावी.

( हनवंतराव देशमुख – संचालक महागांव खरेदी-विक्री संघ )

Copyright ©