यवतमाळ सामाजिक

लिंगायत समाज ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा

लिंगायत समाज ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा

{पालकांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन}

ज्येष्ठ नागरिक हे अनुभवांचा आणि विचारांचा खजिना आहे ही भूमिका नजरेसमोर ठेवून, तसेच १० वी १२ वी नंतर पुढे काय? आणि मुलांच्या अभ्यासात व करीअर निवडीत पालकांचा सहभाग किती आणि कसा असावा? ह्या करिता कार्यशाळेचे आयोजन तसेच

जिल्ह्यातील समाजातील ७० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ स्त्री पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि सोबतच जिल्ह्यातील १० वी आणि १२ वी परीक्षेत ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या व उच्च शिक्षणात प्रथम श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनीचा तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठान, यवतमाळ ह्यांचे संयुक्त विद्यमाने

खालील मान्यवरांच्या उपस्थितीत २८ ऑगस्ट २०२४ रोजी ३ वाजता महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन लोहारा येथे आयोजित करण्यात आले आहे, ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक तथा माजी कार्यक्रम अधिकारी,आकाशवाणी श्री जयंतकुमार शेटे प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता अरूणराव बाजारे,(आकाशे),मुख्य कार्यकारी अभियंता,सा.बां.विभाग, यवतमाळ,आणि

डॉ.आतिश संजय दर्यापुरकर, सहा.प्राध्यापक भारतीय सुचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपुर

ईत्यादी उपस्थित राहणार आहे,

ह्या कार्यक्रमाला डॉ.आतिष दर्यापुरकर ह्यांचे १० वी १२ वी नंतर पुढे काय? तसेच मुलांच्या अभ्यासात व करीअर निवडीत पालकांचा सहभाग किती आणि कसा असावा?अशा एक ना अनेक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मंडळाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केले आहे डॉ.आतिष दर्यापुरकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पालकांना समुपदेशन करतील. त्यांनी त्यांचे शोध कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर केले आहे. ते या मार्गदर्शना मध्ये, शेतकऱ्याचा मुलगा ते उच्च शिक्षण संस्थेचा प्रोफेसर या जीवन प्रवासाचा अनुभव सुद्धा सांगतील. तसेच कौटुंबिक प्रबोधन आणि लिंगायत समाजाबद्दलची जागरूकता हे त्यांचे आवडते विषय आहे.

या संधीची सुवर्णसंधी करण्याकरता आपल्या सर्वांना आपल्या पाल्यासह जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष

डॉ. जयेश हातगांवकर ह्यांनी वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ, वसुधा प्रतिष्ठान यवतमाळ, बसव क्लब, लिंगायत महिला मंडळ यांचे वतीने केले आहे.

Copyright ©