यवतमाळ सामाजिक

चातुर्मास प्रारंभ- १२ भेदी तप आराधना प्रारंभ महासती व्याख्यात्री निष्ठाश्रीजी म.सा.आदी ठाणा 3 चे आगमन

चातुर्मास प्रारंभ- १२ भेदी तप आराधना प्रारंभ महासती व्याख्यात्री निष्ठाश्रीजी म.सा.आदी ठाणा 3 चे आगमन

जैन धर्मीयांचे चातुर्मास २० जुलै पासून प्रारंभ झाले असून राजेंद नगर येथील स्व देवजी निसर धर्म स्थानक यवतमाळ येथे चातुमीसार्थ जिन शासन गौरव रत्नवंश अष्टमआचार्य हीराचंन्द्रजी म.सा.भावी आचार्य महेंद्रमुनी म.सा.यांचे आज्ञेनुसार प.पु. महासतिजी व्याख्यात्री श्री निष्ठाश्रीजी म. सा. आदी ठाणा 3 यांचे आगमन झाले असुन चातुर्मास निमित रोज सकाळी ६.१५ ते 7 नियमीत प्रार्थना सकाळी ८.३० ते ९.३० प्रवचन दुपारी 2 ते 3 धर्मचर्चा स्वाध्याय, प्रतिक्रमण व रात्री ८ ते 9 महिलांन साठी धर्म चर्चासत्राचे आयोजन कण्यात आले आहेत.

22 जुलै पासून महासती मधुर व्याख्यात्री निष्ठाप्रभाजी मा.सा यांचे मार्गदर्शनात १२ दिवस १२ नियम १२ भेदी तप आराधना चे आयोजन करण्यात आले आहे तर नियमित पणे एकासना, आयंबिल, उपवास, सामायीक स्वाध्याय तप मोठ्या प्रमाणात सुरु असुन, जैन बांधव मोठ्या संख्येने शामिल होत आहेत चातुर्मासा अंतर्गत विधी विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत याचा सकल जैन बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जैन सेवा समीतीचे अध्यक्ष डॉ रमेश खिवसरा चातुर्मास समितीचे अध्यक्ष महावीर भंसाली यांनी केले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे

Copyright ©