यवतमाळ सामाजिक

दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करनारा आरोपी विस दिवसानंतर अटकेत

दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करनारा आरोपी विस दिवसानंतर अटकेत

यवतमाळ राळेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाठोडा येथील अन्यायग्रस्त अल्पवयीन दिव्यांग मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपी किशोर सुखदेव शंभरकर रा. पोहणा तालुका हि़गणघाट याने २७ जून २०२४ रोजी सकाळी पीडित मुलीचे आई-वडील शेतात काम करण्याकरिता गेले असताना संधीचा फायदा घेऊन आरोपीने सकाळी दहा १० :०० वाजता दिव्यांग मुलीवर घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप दिव्यांग मुलीच्या आई-वडिलांनी केला आहे.

ज्या दिवशी अत्याचार झाला त्याच दिवशी पालकांनी राळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र आरोपी पसार झाला होता. त्यानंतर आरोपी पाच सहा दिवस होऊनही पोलिसांना मिळाला नसल्याने पीडित मुलींचे आजोबा आरोपी मिळाला किंवा नाही हे विचारण्या करिता पोलीस स्टेशनला गेला असता पोलिसांनी त्यांना सांगितले की आम्ही आरोपीचा शोध घेतो असे सांगितले मात्र दहा बारा दिवस लोटूनही आरोपी मिळाला नसल्याने याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली त्यानंतर त्यांनीही सांगितले की तुम्ही शांत बसा आम्ही आरोपीचा शोध घेतो असे सांगितले मात्र त्यानंतरही आठ दिवस लोटले असतांना आरोपी मोकाटच फिरत असताना पोलिसांना कसा मिळाला नाही म्हणून पीडितांच्या आजोबा आई वडील यांनी पत्रकारानी ही माहिती देवून झालेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर वृत्तपत्रात या घडलेल्या अत्याचारा बाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच व नव्याने आलेले ठाणेदार एस एम मेहत्रे यांनी याबाबत माहिती घेऊन पथक तयार केले या पथकात दुय्यम ठानेदार विशाल बोरकर व त्यांच्या सहकारी यांनी काही दिवसातच आरोपीचा शोध घेऊन आरोपी किशोर सुखदेव शंभरकर याला अटक केली असून अधिनियम २०१२ अंतर्गत ३५४,३४५ ए ४५२ नुसार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास राळेगांव पोलिस करीत आहे.

Copyright ©