यवतमाळ सामाजिक

आर्णी बसस्थानकातील खड्डे देत आहे अपघाताला निमंत्रण

आर्णी बसस्थानकातील खड्डे देत आहे अपघाताला निमंत्रण

प्रवाशानी खड्डे बुजविण्याची केली बसस्थानक प्रमुखाला विनंती

आर्णी बसस्थानकात खड्डेच खड्डे पडले असुन प्रवाशांना आता पावसाळ्यात बसस्थानकात जाण्यासाठी खड्डयाच्या साचलेल्या पाण्यातुन व चिखलातुन बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे त्या खड्डयान मधे पावसाचे पाणी भरल्याने कोणता खड्डा मोठा कोणता लहान हे वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने बस चुकुन मोठ्या खड्डयात गेली की बस पुर्णांत:एका कडेला झुकल्या जाते त्यामुळे एका कडेचे प्रवाशी बसच्या दुस-या कडेला सरकल्या जाते त्यामुळे वृध्द,लहान बालकांना बस मधेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच बसस्थानकात प्रवेश करतांना त्या साचलेल्या खड्डयातील पाण्यातुन प्रवाशांना वाट काढवी लागते व तसेच सदर खड्डयातील घाण पाणी अंगावर येते त्यामुळे प्रवाशांना या खड्डयाचा नाहक त्रास सोसावा लागत आहे तसेच नविन बसस्थानकाचे काम सुरु असल्याने येथिल कामावर जड वाहनाची वाहतुक होत असल्याने मागील वर्षी पेक्षा ही मोठमोठे खड्डे बसस्थानकाच्या आवारात तयार झाले आहे तेव्हा दारव्हा आगार प्रमुख यांनी सदर बसस्थानकातील पडलेल्या खड्डयाची तात्काळ दखल घेवुन सदर ठिकाणच्या खड्डयात मुरुम व चुरी टाकुन डागडुजी करण्याची मागणी स्थानिक प्रवाशी बांधवानी केली आहे

Copyright ©