यवतमाळ सामाजिक

कळंब तालुक्यातील 12 सामुहिक वनहक्क प्राप्त गावात वन बीज टोबनी अभियान संपन्न

कळंब तालुक्यातील 12 सामुहिक वनहक्क प्राप्त गावात वन बीज टोबनी अभियान संपन्न

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, संस्था यवतमाळ द्वारा यवतमाळ जिल्हयातील 220 सामूहिक वनहक्क प्राप्त गावात शाश्वत उपाजीविका आणि पर्यावरण सुरक्षा प्रकल्प राबविला जात आहे. श्रीकांत लोडम कार्यक्रम समन्वयक व प्रफुल्ल ऊके, क्लस्टर कोर्डीनेटर यांच्या मार्गदर्शनात या प्रकल्प अंतर्गत कळंब तालुक्यातील दुर्गम भागातील पिंपळखुटी, हिवरी, उमरगाव अंजनी, टपाल हेटी, बेलोना, चापरडा, घोटी, निमगव्हाण, दुर्ग, सरपदरी, देवनाळा, खडकी या गावात वनहक्क प्राप्त क्षेत्रामध्ये एकूण 36 हेक्टर मध्ये वन बीज टोबनी करण्यात आली. यामध्ये चारोळी, निबोळी, मोहटोळ, जांभूळ, बेल, चिंच, बाहवा, बिहाडा इत्यादी प्रकारचे 39 किलो वनबीज लावण्यात आले. जंगलाचे व निसर्गाचे संरक्षण, संगोपन, संवर्धन, पुनर्निर्माण व व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे व जास्तीत जास्त बीज टोबनी करून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हा या वन बीज टोबनी अभियाना चा उद्देश.

सामुहिक वनहक्क प्राप्त गावातील बीज टोबनी करिता सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- मंगेश मरापे, प्रमिला वरणकर, रामभाऊ चांदेकर, तुकाराम रामपुरे, अजय मधुकर खडकी , दिनेश पोलु खडकी, श्रीराम मंगुळकर, सीमा कासार, महादेव घोटेकर

सचिव- ज्ञानेश्वर खोरदे,वेणु शिवणकर, रेणुका जांभुळकर, बळिराम टेकाम व कोषाध्यक्ष- मंगला मलांडे,बेबि टेकाम, इंदिरा टेकाम,शोभा रायगड, लीलाधर गुलाब चावरे, सुनीता कामदी, मालू भोयर, वैशाली आमजोरे, आनंदराव ठाकरे व वन हक्क व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य, गावातील सरपंच-चंद्रभान मडावी स्टेकहोल्डर, वनरक्षक – व्ही.आय.नागरकर,नागरकर व बचत गटाचे सदस्य, स्वयंसेवक तसेच अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट चे कार्यकर्त्ये – चंदन मलांडे, ताई गलाट, कल्पना आत्राम, उज्वला आत्राम, शंकर चिचघाटे आणि अंतरा ठोंबरे

यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©