यवतमाळ सामाजिक

लाडकी बहीण योजनेसाठी आमदार देवेंद्र भूयारांनी घेतल्या कार्यशाळा ! तर बारी समाजा कडून भुयार यांचा सत्कार!

लाडकी बहीण योजनेसाठी आमदार देवेंद्र भूयारांनी घेतल्या कार्यशाळा ! तर बारी समाजा कडून भुयार यांचा सत्कार!

वरूड तालुका प्रतिनिधी : ‘माझी लाडकी बहीण योजना याविषयी विविध शंका कुशंका तसेच करण्यात येणारी कार्यवाही या संदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी वरूड तालुक्यात विवीध ठिकाणी मार्गदर्शनपर शिबीर व कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार देवेंद्र भुयार तर प्रमुख उपस्थितीमध्ये मोर्शी वरूड येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी, महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी, हे प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी नारीशक्ती ॲप डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले.

आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले की, शासनाने ऐतिहासिक निर्णय या संदर्भात घेतला असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अर्ज भरण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले यासाठी शासन विशेष असा भत्ता सेविकांना देणार असल्याचेही सांगितले. संजय गांधी निराधार योजनेचे अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना याचे फॉर्म भरता येणार नाही, पी एम किसान व सीएम किसान योजना म्हणून प्रति वर्ष 12 हजार रुपये महिलांना मिळत असतात त्या महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेतील फरकाचे सहा हजार रुपये मिळतील असे सांगत आधार कार्ड व बँक खाते हे लिंक करण्यात यावे तसेच ओटीपीच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरताना खबरदारी घेण्यात यावी जेणेकरून महिलांची आर्थिक फसवणूक होणार नाही असे निर्देशही आमदार देवेंद्र भुयार यांनी याप्रसंगी दिले. यापुढे विभागनिहाय तालुक्याचा शिबिर घेण्यात येणार आहे असून याप्रसंगी अर्ज हे प्रशासनातर्फे पुरवण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन हे अर्ज भरायचे आहे व या संदर्भात काही अडचण असेल तर आपले कार्यकर्ते मदत करतील असेही आमदार देवेंद्र भुयार यांनी या प्रसंगी सांगितले. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी आपल्या शंका विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले व त्याचे निराकरण आमदार देवेंद्र भुयार तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

बारी समाजाचे स्वतंत्र महामंडळ स्थापन झाल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य सत्कार

वरूड तालुका प्रतिनिधी : बारी समाजाच्यावतीने राज्यभरातील शिष्ट मंडळाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट देऊन समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ द्यावे अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दाखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात सदर विकास महामंडळाची घोषणा केली त्यामुळे बारी समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनिबश्री. संत शिरोमणी रूपलाल महाराज बारी समाज पानपिंपरी आर्थिक विकास महामंडळ व स्मारक निर्माण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाकडून मंजूर केल्याबद्दल बारी समाजातर्फे आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बारी समाज भवन जरुड येथे शेकडो बारी समाजाच्या नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी अमादर देवेंद्र भुयार यांनी सत्कार समारंभाला उपस्थित राहून केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले. व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढील काळात देखील प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी व्यक्त करत कायम समाज बांधवांच्या ऋणात राहील असा विश्वास आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी व्यक्त केला.

समाजाच्या विविध मागण्या सह बारी समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ देण्यात यावे अशी मागणी मागील दोन वर्षांपासून अमादार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे रेटून धरून विधानसभेत लक्षवेधी द्वारे शासनाचे लक्ष वेधून यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे बारी समाजाच्या या विषयाचे महत्त्व व गांभीर्य पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात बारी समाजासाठी राष्ट्रसंत शिरोमणी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार देवेंद्र भुयार यांचे बारी समाजाने आभार मानले असून राज्यात बारी समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी बघायला मिळाले.

Copyright ©