समाजसुधारक डॉ मिनाक्षीताई सावळकर जन्म दिवसानिमित्त अनाथ निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेणार टाकळी
येत्या एक जुलै रोजी वाढदिवसाच्या मुहूर्तावर तालुक्यातील अनाथ निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असे आपले उदात्त व्यापक विचार मांडून प्राध्यापक मिनाक्षी ताई सावळकर सर्वांना प्रभावित केले आहे आपल्या सामाजिक कार्याचा आशय प्राप्त करून देणारी लोकप्रिय मिनाक्षी ताई सावळकर यांचे विचार किती श्रेष्ठ ठरत आहे यांचे उदात्त व्यापक पाहून विविध पक्षांचे नेते चकित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ? यवतमाळ जिल्ह्यातील चळवळीसाठी राबणारे हात आता आत्महत्याग्रस्त तालुक्यातील अनाथ निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिलासा देण्यासाठी झटत आहेत मिनाक्षी ताई सावळकर यांचे ज्ञान थक्क करून सोडणारे असून अनाथ मुलांवर अन्याय व्हायला नको आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या मिनाक्षी ताई यांचे नाव तालुक्यात अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जात आहे अनाथ निराधार विद्यार्थ्यांना आपल्या मायेच्या स्पर्शाने आपलसं करणाऱ्या या मातेची कहाणी मतदारसंघाला थक्क करणारी आहे विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन मन जिंकत आहे गांधीजींच्या आदर्शवादाचे जणू हे संस्कार प्राध्यापक डॉ मिनाक्षीताई सावळकर आपल्या जन्म दिवसानिमित्त अनाथ बहुजन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अशा एकापेक्षा एक विलक्षण सामाजिक उपक्रमांचे यशस्वी ध्यास घेत आहे समाजाला सहज पटेल आवडेल अशा शब्दांत आपले विचार मांडत असून अनाथ बहुजन समाजातील विद्यार्थी वैज्ञानिक तांत्रिक आर्थिक क्षेत्रात सक्षम व्हावेत प्रगतीकडे झेप घ्यावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सूर ऐकायला मिळत आहे माणुसकीच्या मूल्यांशी जोडली गेलेली कॉंग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन मतदारसंघात उभी राहणारी काळ्या आईवरील उत्कट श्रद्धा व्यक्त करणारी मिनाक्षी ताई .. वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छा
Add Comment