यवतमाळ सामाजिक

वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्षा वर्षा पडवे स्मशानभूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा

वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्षा वर्षा पडवे स्मशानभूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा

वाढदिवस म्हटलं की अनेकांना आपला वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्याचा हेतू असतो.या हेतूने सामाजिक उपक्रम राबवीवून वाढदिवस साजरा करतात.कोणी हॉस्पिटल फळ वाटप करुनच तर कोणी लहान मुलांसोबत साहित्य वाटप करुन,तर कोणी अनाथ मुलांसोबत,वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करतात मात्र वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष वर्षा पडवे यांनी स्मशानभूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.वसुंधरा फाउंडेशनच्या नावाप्रमाणेच वसुंधरेला शोभेल असा उपक्रम राबवून एक नवीन पायगंडा त्यांनी यावेळी घालून दिला.काही दिवसापूर्वी त्यांच्या मैत्रिणीच्या वडिलांचे निधन झाले होते मात्र त्यांना असे लक्षात आले की भर उन्हात उभे राहण्यासाठी व सावलीसाठी एकही वृक्ष या स्मशानभूमीत नाही.या ठिकाणी वृक्षारोपण करून येणाऱ्या पुढील या ठिकाणी सावलीचा उपयोग घेता यावा या उदात्त हेतूने त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून पहूर (पुनर्वसन) चांदोरे नगर लगत असलेल्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.यावेळी

वर्षा पडवे यांचेसह माधुरी कोटेवार,पुष्पा पोहनकर,अर्पिता पोहनकर,कुणाल कोवे,पियुष ढाले,वैभव आत्राम,ज्योती वानखेडे,सविता कोळी, वर्षा कुंभरे ,हर्षा कुंभरे ,माधुरी वरके,सानिका भुजाडे, मनुबाई गुल्हाने आदी महिला उपस्थित होत्या..

Copyright ©