`पाहुणे झाले दंग ऐकुनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग`
आषाढी एकादशी च्या शुभ मुहूर्तावर आज मल्लिकार्जुन मंगल कार्यालय दिग्रस येथे श्री नाना भाऊ बंगळे यांची पुतणीचा
विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता .या सोहळ्यात पाहुणे मंडळीचे मनोरंजन व प्रबोधन व्हावे या उद्देशाने बंगळे परिवाराने सिनेकलावंत श्री सुनिल चव्हाण
निर्मित जिव्हाळा कला संच उमरखेड यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. संचातील कलावंत श्री डी जी साखरे .श्री अशोक इंगोले .श्री शिवाजी चवरे .श्री राजेश मेश्राम श्री रसिक स्थूल .कल्पना मस्के आणि सुनिल रामचंद्र चव्हाण यांनी अभंग .भक्ती गीते .भावगीते लग्न गीते .हिंदी मराठी व प्रबोधनपर गीते आणि संगीतमय मंगलाष्टके सादर करून पाहुणे मंडळीना मंत्रमुग्ध केले .बंगळे परिवाराच्या वतीने सर्व कलावंतांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला .
Add Comment