चेतन पवार प्रतिनिधी
ग्रा.पं.डोल्हारी देवी येथील रस्त्याचे दुरवस्था
डोल्हारी देवी वार्ड क्र.२ ची रस्त्याचा वनवास कधी संपणार
वाट काढणे झाले कठीण,चिखलात रस्ता की रस्ता चिखल
दारव्हा..तालुक्यातील ग्रामपंचायत डोल्हारी देवी येथील गावात जाण्यासाठी असलेल्या गावातील मेन रोड लिंबाजी पवार यांच्या घरा पासून ते गोविंद तूनगर यांच्या घरा पर्यंत वॉर्ड क्रमांक २ ची अशी रस्त्याची दुरवस्था आहेस. त्या रस्त्याची अतिशय बिकट दूरवस्था झाली असून डोल्हारी देवी गावातील नागरिकांना या मार्गेने जात असताना मोठी कसरत करावी लागते आहे. गावातील नागरिकांना इतर ठिकाणी जायचे असल्यास, या रस्त्याची अतिशय दूर अवस्था झाले असून जागोजागी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामध्ये आता पावसाचे पाणी साचत असून नागरिक या चिखलातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. गावातील नागरिक व शाळेतील विद्यार्थीना त्याच रस्त्याच्या मार्गाने जावे लागत असल्याने त्यांच्या शाळेच्या युनिफॉर्म वाचूनच चालावे लागते रस्त्याने जात असताना यदा कदाचित चिखलातून अपंग,नागरिकांना व विद्यार्थ्यांना घरी येणे जाणे करावे लागतात. असा प्रश्न यावेळी नागरिकांना पडतो किती वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून सुद्धा ग्रा.पं. डोल्हारी देवी व प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. डोल्हारी देवी येथिल वार्ड क्र.२ रस्त्याचे दैनंदिन अवस्था झाले असून येथील नागरिक गेल्या किती वर्षापासून रस्ता होण्याची चातकासारखी वाट बघत आहे. मात्र त्यांना नागरिकांना रस्ता तयार करून मिळत नाही. परिणामी येथील नागरिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता पावसाळा सुरू झाला असून रस्त्यामुळे नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वार्ड क्र.२ मधील नागरिक मागील पंधरा ते वीस वर्षापासून ग्रामपंचायतचे चकरा मारत आहे. वार्ड क्र.२ मधील नागरीक रस्त्यासाठी लेखी/तोंडी सांगून सुद्धा सरपंच/ग्रामसेवक यांनी उडवा उडवी चे उत्तर मिळतात नागरीकांना. ग्रामपंचायत चे हेलपाटे मारूनही ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष होत आहे. असून ग्रामसेवक सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी आज ना उद्या होईल असे उडवाउडुचे उत्तर सांगतात. शासनाकडे आम्ही पाठपुरावा करीत आहे व आचारसहिता आहेस. व आचारसंहिता संपल्यावर तुमचे काम होईल असे सांगतात. आचारसहिता संपूर्ण खूप दिवस झाले तरी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. वार्ड क्र.२ मध्ये उपसरपंच असून सुद्धा त्यांचे पण दुर्लक्ष रस्त्याकडे होत आहे.सरपंच व ग्रामसेवक वार्ड क्र. २ मधील रस्त्या कडे तातडीने लक्ष देण्याची गावातील नागरिक मागणी करीत आहे.
चिखलात रस्ता की रस्ता चिखल
या रस्त्याची दुरवस्था अतिशय झाली असून चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हे समजणे मुश्किल झाले आहे पावसामुळे रस्त्यात चिखल असल्यामुळे नागरिकांना येणे जाण्याकरिता कठीण झाले असून या समस्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष देऊन लवकरात लवकर नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यावी.
वार्ड क्र.2 मधील नागरिक डोल्हारी देवी
डोल्हारी देवी वार्ड क्र.२ रस्त्याचे अवस्था
ग्रा.पं.डोल्हारी देवी येथील सरपंच/ग्रामसेवक यांना फोन द्वारे विचारणा केली असता. वार्ड क्र. २ त्या रस्त्याची काय अवस्था आहे असे विचारले आमचे प्रतिनिधी चेतन पवार यांनी सरपंच ग्रामसेवक यांनी सांगितले की आम्ही पाठपुरावा केल आहे. आता आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यावर कामाला सुरुवात करू असे सांगितले.
सरपंच /ग्रामसेवक ग्रा.पं.डोल्हारी
Add Comment