गावचा विश्वासपात्र रक्षकच निघाला भक्षक
रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणी मुख्य सूत्रधार तिवसा येथील सरपंच नरेश वामन राठोड..
तिवसा:- गेल्या अनेक दिवसंपासून चोरी आणि दरोडा चे प्रकरण चर्चेत असतानाच नांदेड ते वर्धा रेल्वेचे कामे सुरू आहे,सबब चे रेल्वे प्रकल्प यवतमाळ तालुक्यातील तिवसा ह्या गावातील शेतशिवारातून सुरू आहे असे असताना तिवसा गावाचे सरपंच नरेश वामन राठोड हे अनेक दिवांपासून रेल्वेकामी असलेली मालमत्ता चोरत असल्याची बाब प्रामुख्याने पुढे आली असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तिवसा येथील जनतेने विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतनिधी अशा पद्धतीचा अवलंब करून विश्वासाचा घात करू शकतो हे कदापि जनतेने विचार केले नसावे.परंतु सदर चे प्रकरण पहिलेच नसून हयाआधी सुद्धा सरपंच नरेश वामन राठोड यांनी बनावट शासकीय कर्मचारी असल्याचे सांगून रास्त भाव धान्य दुकनदारांकडून खंडणी वसूल करण्याचे गैरकृत्य केले होते व त्या प्रकरणात राजकिय दबाव असल्याने सरपंच व त्यांच्या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल असून सुद्धा अटकेपासून बचावले व त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे.परंतु गेल्या आठवड्यात सरपंच नरेश वामन राठोड यांनी स्वतःच्या शेतशिवारा मध्ये जवळपास २५ क्विंटल लोहा व सेंट्रिंग प्लेट जमिनीखाली लपवून ठेवले होते सबब ची मालमत्ता लाडखेड पोलिसांनी उकरून काढल्या असताना ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन लाडखेड येथील कर्मचारी पो.हे. कॉ. शालीक किसन लडके यांनी फिर्याद दिली असताना अप. क्र.३१८/२०२४ अंतर्गत भा. दं.वि.चे कलम ३७९ दाखल करण्यात आले तेव्हापासून सरपंच नरेश वामन राठोड हे फरार आहे व राजकीय दबाव आणत असल्याची चर्चा आहे परंतु नरेश वामन राठोड व त्यांच्या टोळीची अटकेची कारवाही करणार का? ह्याकडे सगळ्यांनी लक्ष वेधले आहे. तपासकामी टोळीतील राजेश विष्णू राठोड व उमेश प्रेमसिंग राठोड यांना सखोल तपासाकरिता ताब्यात घेण्यात आलेली होती व गुन्ह्यातील इतर उर्वरित आरोपी फरार आहे. तसेच सरपंच नरेश वामन राठोड यांच्या प्रत्येक दुष्कर्मामध्ये सहकार्य करणारी मंडळी म्हणजेच चेतन भाऊराव चव्हाण व रणधीर केशव चव्हाण यांचेवर सुद्धा तपास यांत्रणेला संशय निर्माण झाल्याने शोध सुरू आहे.
Add Comment