तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकरी संघटना प्रतीबंदीत एचटीबीटी कापूस लागवड आंदोलन करणार
दिनांक 27 जुलै 20 24 रोजी तूप टाकळी तालुका दिग्रस येथे शेतकरी संघटना आयोजित तंत्रज्ञान परिषद व प्रतीबंधित एस टी बी टी लागवड आंदोलन आयोजित केले असून. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वामनराव चटप, शेतकरी संघटना अध्यक्ष ललित बहाळे, साउथ एशिया बायोटेक चे माजी अध्यक्ष सी डी माई हे भाग घेणार असून यामध्ये तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले, महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख प्रज्ञाताई बापट शेतकरी संघटना कार्यकारणी सदस्य विजय निवल हे भाग घेणार असून. देशामध्ये सध्या जीएम तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा दृष्टीने हे आंदोलन आणि तंत्रज्ञान परिषद आयोजित केलेली आहे त्यामध्ये जिल्ह्यातील नेते राजेंद्र झोटिंग अध्यक्ष शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हा, दीपक अण्णा आनंदवार ज्येष्ठ नेते शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हा पश्चिम अध्यक्ष देवेंद्र राऊत, चंद्रशेखर देशमुख, बबनराव चौधरी, अविनाश पोळकट, मनीष जाधव अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, हे भाग घेणार असून स्थानिक सर्व कार्यकर्ते यामध्ये भाग घेणार असून. एचटीबीटी बियाण्याची लागवड तूप टाकळी शिवारात करणार ,यामध्ये शेतकरी सहभागी होत आहे. देश पातळीवर जीएम सीडचा विषय पुन्हा दिल्लीमध्ये संसदेच्या पटलावर यावा करिता प्रतीबंधित एच टी बी टी कापसाची लागवड करुन सविनय कायदे भंग आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, अक्षय महाजन,ईदरचंद बैद, गोपाल भोयर, सोनाली मरगडे, प्रज्ञाताई चौधरी, गजानन ठाकरे,बंडूजी येरगुडे, हरीभाऊ ढोरे, राजु ठाकरे ,राहील पठाण, विवेक देशमुख, यांनी केले
Add Comment