सुरजागड लोह प्रकल्पामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लाखो झाडांची कत्तल
बल्लारपूर येथे विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनात सुरजागड प्रकल्प बंद करण्याबाबत निघाला सूर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य शाखा बल्लारपुर च्या वतीने 9 जून 2024 रोजी एकदंत सभागृह बल्लारपुर येथे विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
संमेलनाचे उदघाटन नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सुधाकरजी अडबाले सर यांनी केले तर कार्यक्रमाचे अतिविशिष्ट अतिथी म्हणून चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर भाऊ जोरगेवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पर्यावरण समितीचे अध्यक्ष दलीतमित्र आदिवासी सेवक डी.के.आरिकर हे होते, विशेष अतिथीच्या रुपात घनश्यामजी मूलचंदानी माजी नगराध्यक्ष बल्लारपुर, ऍड.वैशाली टोंगे प्रसिद्ध विचारवंत चंद्रपूर, डॉ.अभिलाषा गावतुरे भूमिपुत्र ब्रिगेड, प्रमुख अतिथी म्हणून ऍड.हिराचंद बोरकुटे, डॉ.बळवंत भोयर, विठ्ठलराव मासटवार, गुणेश्वर आरिकर, हरीश ससनकर, सुरेश गुडधे पाटील नागपूर, दादाराव डोंगरे,वैशाली रोहनकर, वर्षा कोठेकर, प्रदीप महाजन, रामरतन देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.टी.डी.कोसे खत्री महाविद्यालय चंद्रपूर यांनी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले.
सध्यस्थीतीत चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणाने थैमान घातले आहे याचे कारण जिल्ह्यात कोलमाईन्स, मोठं मोठे पॉवर प्लांट, कोलवाशरीज, पेपर मिल, राईस मिल, सिमेंट कारखाने, स्पंज आयरण कारखाने यांच्यामुळे, त्यात भर पडली ती सुरजागड लोह प्रकल्पातून निघणाऱ्या गाड्यांची यामुळे अनेकांना अपघातात आपले जीव गमवावे लागले आहे सोबतच फुफुस, हृदयाच्या अनेक आजारांचा संसर्ग त्यामुळे नागरिकांना होत आहे. आणि त्यामुळे नागरिकांनी जगावं की मरावं अशी अवस्था झाली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांचे जीव घेऊन जर विकास होत असेल तर असा विकास काही कामाचा नाही असे विचार आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील प्रदूषणाचे प्रश्न विधानसभेच्या माध्यमातून मांडण्याची ग्वाही आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी दिली. डी.के.आरिकर यांनी सुरजागड लोह प्रकल्प गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्याच्या जीवावर उठत आहे त्यामुळे यावर कडक उपाययोजना तात्काळ करण्याची गरज व्यक्त केली. यासह घनश्याम मूलचंदानी, डॉ.अभिलाषा गावतुरे ऍड वैशाली टोंगे, बळवंत भोयर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते “पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन” करण्यात आले. तसेच विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनोद दोंदल, विनोद सातपुते आशा अनोक व्यक्ती व संस्थांचा पर्यावरण मित्र, पर्यावरण रत्न व पर्यावरण भूषण, समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
बल्लारपुर तसेच विदर्भातील असंख्य पर्यावरण प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली. कार्यक्रमाचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष दलीतमित्र व आदिवासी सेवक डी.के.आरिकर, सचिव हरीश ससनकर, महिला अध्यक्ष स्वाती दुर्गमवार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर शाखेचे अध्यक्ष सुधीर कोरडे, केशव थिपे, राजेश बट्टे, अतुल बांदुरकर, सचिन बरडे यांनी केले.संचालन विशाल शेंडे यांनी केले.
Add Comment