यवतमाळ सामाजिक

रक्तदान ही चळवळ व्हावी – प्रा.प्रवीण देशमुख

रक्तदान ही चळवळ व्हावी – प्रा.प्रवीण देशमुख

जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा..

आज जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने यवतमाळ शहरातील लोहारा परिसरातील स्थानिक सौ.अर्चनाताई गाडे पाटील नर्सिंग कॉलेज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,सोशल मीडिया काँग्रेस कमिटी,एम.एच.२९ हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटना व आव्हान संघटना,यवतमाळ च्या वतीने जागतिक रक्तदाता दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी १४ जून रोजी आयोजित केला जातो.हा कार्यक्रम प्रथमच २००४ मध्ये चार प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे आयोजित करण्यात आला.सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली.जागतिक रक्तदाता दिनाच औचित्य साधून इंडियन नॅशनल काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ते प्रा.प्रवीण देशमुख सरांनी उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.युवकांच्या माध्यमातून रक्तदान ही एक चळवळ व्हावी हा आशावाद सरांनी व्यक्त केला.सरांच्या आव्हानाला होकार देत विद्यार्थ्यांनी वर्षातून दोन वेळा रक्तदान करण्याचा संकल्प सुद्धा केला.प्रास्ताविक पर भाषणात प्रा.पंढरी पाठे यांनी रक्तदाता दिनाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.दरम्यान या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ.गाडे पाटील सर,प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव सचिन मनवर,आव्हान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रद्युम्न जवळेकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग,कर्मचारी बांधव उपस्थित होते.आयोजित रक्तदाता दिनाच्या कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मानले.

Copyright ©