यवतमाळ सामाजिक

विनोद दोंदल समाज भुषण वपर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

विनोद दोंदल समाज भुषण वपर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ- सामाजिक कार्यकर्ते, विनोद दोंदल यांचा पर्यावरणाचा व निसर्गाप्रती करत असलेल्या सामाजिक कार्याचा समाज भूषण व पर्यावरण मित्र म्हणून सत्कार करण्यात आला,

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर (बल्लारशा) येथे एकदंत सभागृहात दि.९ जून ला नुकत्याच संपन्न झालेल्या पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संम्मेलन २०२४ पार पाडण्यात आला, या कार्यक्रमात सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व सन्मान करण्यात आले, या सन्मान सोहळ्यात सम्मेलनाचे उद्घाटक मा. सुधाकरजी अडबाले शिक्षक आमदार नागपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डी. के. आरीकर अध्यक्ष प. स. व वि. स, सहउद्घाटक सुभाषभाऊ धोटे आमदार राजुरा , विशेष अतिथी किशोरभाऊ जोरगेवार आमदार, चंद्रपूर, चंदनसिंह चंदेल वनविकास माजी अध्यक्ष, कार्यक्रम संयोजक सुधीर कोरडे, गुणेश्वर आरीकर अध्यक्ष, खै. कु. स. विदर्भ प्रदेश, हरिशजी शर्मा, संतोषभाऊ रावत, अॅड. वैशाली टोंगे, डॉ. रजनीताई हजारे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. अभिलाषा गावतुरे, विनोद सातपुते, सुरेखा रडके, वनविकास तानाजी यादव, उमाशंकर भादुले, गिरीश कुमरवार, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. टी. डी. कोसे नितीन तुमडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

विनोद दोंदल यांनी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य जसे वृक्षारोपण करणे, मुलांना आपल्या जीवनातील वृक्षाचे महत्त्व पटवून देणे, ओसाड पडलेल्या जगलात फेकण्यासाठी सीडबॉल तयार करणे व सीडबॉल तयार करण्याची कार्यशाळा घेणे, गरजवंत, बिमार व्यक्तीनं मदत करणे, प्लास्टिक निर्मूलनात सहकार्य करणे, उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाणी पुरवठे तय्यार करणे, असेच एक ना अनेक सामाजिक कार्यात उपस्थित राहून स्वहस्ते उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल विनोद दोंदल यांचा आयोजन समिती पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या कडून मानचिन्ह (ट्रॉफी) व सन्मानपत्र आणि वृक्ष देऊन समाज भूषण, पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले,

हया कार्यक्रमात सर्व महाराष्ट्रातील पर्यावरणावर व सामाजिक क्षेत्रात चागले कार्य करणारे असंख्य समाज सेवक उपस्थित होते, विनोद दोंदल यांनी हा मिळालेला पुरस्कार कोण्या एकट्याचा नसून आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांचा आहे असे सांगीतले..

Copyright ©