यवतमाळ सामाजिक

अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेची जि.प.वर धडक

अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेची जि.प.वर धडक

( मानधनत वाढ करण्याची मागणी )

यवतमाळ :- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर संघटना व राज्य कृती समितीचे वतीने राज्यव्यापी आंदोलनाची दिलेल्या हाकेनुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हा परिषद वर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार श्रमशक्ती भवन यवतमाळ येथुन अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मोर्चा घोषणा देत सरळ जि.प.मार्गे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून संविधान चौकातुन जुना बसस्टँड‌ मार्गे जिल्हापरीषदेवर मोर्चा धडकला त्यात अंशकालीन स्त्री-परिचरांना दरमहा रुपये २६०००/- मानधन / वेतन द्या व आरोग्य खात्यात कायम करा या मुख्य मागणी, सह ईतरही मागण्याचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद यवतमाळ यांचे मार्फत मा.ना.एखनाथजी शिंदे,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,यांना व आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले, दि.२० ऑगस्ट२०१४ रोजी मा.आरोग्य संचालक मुंबई यांनी अंशकालीन स्त्री-परिचरांना रू.१०,०००/- वेतन वाढ देण्यात यावी अशी शिफारस केली आहे.मात्र सरकार या कडे दुर्लक्ष करीत आहे असे संघटनेने म्हटले आहे. अलीकडे राज्याच्या आरोग्य खात्याने रू.६०००/- मानधन वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रीमंडळा कडे पाठविला आहे त्याचीही अंमलबजावणी शासनाने अद्याप केली नाही.मागण्या अंशकालीन स्त्री-परिचरांना दरमहा रू.२६०००/- मानधन/वेतन द्या, त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करा, त्यांना पुर्णवेळ कर्मचारी करा, वारसांना सेवेत घ्या, पेन्शन योजना लागू करा तसेच स्थानिक मागण्या,गणवेश मध्ये वर्षातुन दोन साड्या द्या, पातळ नेसनाऱ्या स्त्री-परिचरांना अद्याप पातळ गणवेश अद्याप दिला नाही तो देण्यात यावा , राहीलेल्यांना ओळख पत्र देण्यात यावी, एप्रिल ते मार्च वर्षभराचे मानधनाचा निधी गटविकास अधिकारी यांचे कडे दिल्या जात असून मानधन दर महिन्याला मीळत नाही या बाबत कडक कारवाई करा यासह‌ इतरही मागण्या करण्यात आल्या शासनाने मागण्या निकाली काढाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी

कॉ.दिवाकर नागपुरे, विजय ठाकरे, विलास संस्थाने, सुवर्णा सोनुने, सोनाली कडूकार, यशोदा झामरे, संगीता म्हैसकर, रूख्मीना सुर्यवंशी, शांताबाई राठोड, कांता रोकडे, बेबीताई गायकवाड, गोदावरी काकडे,पंचाबाई‌ आस्वले, उषाताई शेंबळे,कमल वेले, रेखा लेंगरे आशा कांबळे, उमा शीरनाथ, निर्मला कोल्हे रमाबाई शंभरकर ,वर्षा पीसे, रंजना ढोक,सुमीत्रा जमदाडे,अनुसया सोनकुसरे, कल्पना सवाईमुन, उषा ढबाले, मंगला धवसकर, अल्का काळे, मंदा कांबळे, अंजना बोंनसुले कुसुम टेकाम ,जनाबाई पळवेकर , पण्यरथा काष्टे , स्वरसथी गोलाईत ,शिला रोकडे, वर्षा तोडसाम ,मंगला लंबे, वैशाली निबर्ते , लताबाई सांगळे,उषा राठोड, वंदना मागुळकर, मीरा वाघमारे , हंसमाला शेंडे, मीना राहीले, सुमीत्रा व्यवहारे, दुर्गा कोटनाके, जिजा रीगने,कल्पना सवाईमुन,वाजेदा पठाण , संगीता पीस्तुलकर ,गीता कुळमेथे , गंगु तोडसाम , अर्चना चिकटे, बेबी ठाकरे, शेवंता पवार आशा बोबडे , सोनाली कडुकार , शेवंता पवार, रमा शंभरकर , मिरा वाघमारे ,उषा राठोड, बेबी ठाकरे ,वंदना माडगूळकर, अनुसया सोनकुसरे, संगिता वायदंडे, सुमित्रा जमदाळे , शशीकला भगत ,अर्चना चिकटे, गंगू तोङसाम , सुनीता भस्मे. जयश्री मरापे, पर्वता दाते , वेनु काबले , रंजना ढोके ,धोङाबाई आगोशे , सायराबी मुसा शेख, कविता राठोड ,अंजना सरकुडे ,मिना ठाकरे ,जमना गंगावली, विद्या गिरोलकर, संगिता राठोड, कुसुम जोगदंडे, वंदना मागुळकर, छाया पडघाने, नंदा कांबळे, संगिता जाधव, वनिता मिराशे ,कमल कांबळे ,आशा बोबडे ,सप्ताफुले कांबळे, ,प्रतिभा सुकळकर, सोनाली कुरडकार, वर्षा पीसे,वंजेमाला राठोड, संगीता वायदंडे,या सह शेकडो महिला उपस्थित होत्या

Copyright ©